सोनम कपूरला लग्नासाठी सुटी नको

सोनम कपूर आणि आनंद आहुजाच्या लग्नासंदर्भात आतापर्यंत बऱ्याच अफवा पसरल्या होत्या. यांच्या लग्नाच्या न ठरलेल्या वेगवेगळ्या तारखा प्रसिद्ध झाल्या होत्या. आता या अफवांना “फायनल ब्रेक’लागला आहे. या दोघांच्या विवाहाचा मुहुर्त ठरला आहे. 6 आणि 7 मे रोजी यांच्या डोक्‍यावर मंगल अक्षता पडणार आहेत.

पहिल्यांदा असे समजले होते की यांचे लग्न स्वित्झर्लंडमध्ये होणार आहे, पण हे लग्न विदेशात कोठेही होणार नाही, तर मुंबईतच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईतल्या विवाह समारंभानंतर दिल्लीमध्ये केवळ जवळच्या नातेवाईकांसाठी आणि मित्रमंडळींसाठी भव्य रिसेप्शनचेही आयोजन केले जाणार आहे. त्यापूर्वीच “वीरे दी वेडिंग’ या आपल्या सिनेमाचे शुटिंग संपवण्याचा सोनमचा प्रयत्न आहे. सध्या ती त्याच कामात व्यस्त आहे. तिने लग्नासाठी मोठी सुटी घेतलेली नाही.

लग्नानंतरही तीनच दिवसांनी ती लगेच शुटिंगला सुरूवात करणार आहे. लग्नाबाबत इतर स्टार किती तयारी करतात. मात्र सोनमने लग्नाऐवजी आपल्या कामावरच अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. एकतर यावर्षी तिची काकू म्हणजे श्रीदेवीच्या अकाली झालेल्या मृत्यूमुळे तिचे लग्न पुढे ढकलावे लागले होते. त्यामुळेही कदाचित या लग्नाच्या सोपस्कारांना अधिक महत्व न देण्याचे तिने ठरवलेले असावे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)