सोनम-आनंदच्या लग्नाची पुन्हा चर्चा

बॉलीवुड अभिनेत्री सोनम कपूर आणि उद्योगपती आनंद अहूजा यांच्या लग्नाबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगत आहेत. मात्र, याबाबत दोघांनी कोणतीही औपचारिक घोषणा केलेली नाही. पण सोनम-आनंद यावर्षी मे महिन्यात लग्नबंधनात अडकण्याची शक्‍यता आहे.

सोनम भारतात नव्हे तर परदेशात जाऊन लग्नगाठ बांधणार असल्याचे समजते. यासाठी तिने स्वित्झर्लंड शहराची निवड केली आहे. या शाही विवाहसोहळ्याचे पाहुण्यांना आमंत्रण देण्याची जबाबदारी खुद्द सोनमचे वडील अनिल कपूर यांनी स्वीकारली आहे. संगीत, मेंदीचा कार्यक्रम आणि पारंपरिक पद्धतीने सर्व विधी करून सोनम-आनंदचा विवाह होणार आहे.
या सोहळ्यास नातेवाईक आणि जवळचे मित्रमंडळी उपस्थिती लावणार आहेत. कपूर कुटुंबियांनी लग्नासाठी ठिकाण शोधण्यास तब्बल तीन महिने घालविल्याचे समजते. सोनम या खास दिवशी अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाईन केलेल्या आउटफिटला पसंती देईल, असे बोलले जात आहे.

हा सोहळा 11 आणि 12 मे रोजी दोन दिवस रंगणार असल्याचे समजते. याच दरम्यान कान्स चित्रपट महोत्सव असल्याने त्यात सोनम नक्‍कीच सहभागी होणार आहे. कारण सोनम 7 वर्षांपासून लॉरेलची ब्रॅण्ड ऍम्बेसेडर आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)