सोनम परदेशात बांधणार लग्नगाठ

अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा प्रियकर आनंद अहुजा एप्रिल महिन्यात विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगत आहे. सोनम परदेशात जाऊन लग्नगाठ बांधणार असल्याचे समजते. यासाठी तिने स्वित्झर्लंडची निवड केली आहे. या शाही विवाहसोहळ्याचे पाहुण्यांना आमंत्रण देण्याची जबाबदारी खुद्द अनिल कपूर यांनी स्वीकारली आहे. संगीत, मेंदीचा कार्यक्रम आणि पारंपरिक पद्धतीने सर्व विधी करुन सोनम-आनंदचा विवाह होणार आहे.

नातेवाईक आणि जवळचे मित्रमंडळी या सोहळ्यास उपस्थिती लावणार आहेत. कपूर कुटुंबियांनी लग्नासाठी ठिकाण शोधण्यास तब्बल तीन महिने घालविल्याचे समजते. सोनम या खास दिवशी अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाईन केलेल्या आउटफिटला पसंती देईल, असे बोलले जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)