सोनमला विवाहानंतर ‘याची’ इतकी घाई का झाली? नेटकऱ्यांने केले ट्रोल

काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकलेली अभिनेत्री सोनम कपूरवर आता टीका होत आहे. याचे झाले असे की, सोनमने आनंद अहुजासोबत लग्न झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच आपल्या ट्‌विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊण्टवरचे नाव बदलले. ‘सोनम कपूर’ हे नाव बदलून तिने ‘सोनम के अहुजा’ असे ठेवले, यामुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.

स्त्री-पुरुष समानतेच्या गोष्टी करणाऱ्या सोनमला नावात बदल करण्याची इतकी घाई का झाली होती? अशी प्रतिक्रिया उमटत आहे. मात्र, काही चाहत्यांनी सोनमची पाठराखण केली आहे. हा प्रत्येकाच्या स्वातंत्र्याचा मुद्दा आहे. नावात बदल करणे हा वैयक्तिक प्रश्‍न आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)