सोनपावलांनी आलेल्या गौराईची आरास

पाहण्यासाठी तरुणींची झुंबड ः मुटकेवाडी सह मेदनकरवाडी मधील रस्ते फुल्ल
वाकी  -लेक वाचवा, पर्यावरण वाचवा व पाणी बचतीचा संदेश देत, मुटकेवाडीसह नाणेकरवाडी व मेदनकरवाडी (ता. खेड) परिसरात घराघरात आनंदात आणि चैतन्यमय वातावरणात सोनपावलांनी आलेल्या गौराईंची सजावट व आरास पाहण्यासाठी येथे महिला व तरूणींची रात्री उशिरापर्यंत झुंबड उडाली आहे.
लक्ष्मीच्या रूपाने आलेल्या या माहेरवाशिणीच्या स्वागताची तयारी महिला व तरुणी गेल्या अनेक दिवसापासून करत असल्याचे रेश्‍मा गोसावी, माधुरी गोसावी यांनी सांगितले. लाडू, करंज्या, चकल्या, अनारसे आदि पंच पक्वान्न त्याच बरोबर गौरीच्या सजावटीसाठी साड्या, दागदागिने आदी गोष्टींची तयारी करण्यात आली असून, या गौरींना भर भक्कमपणे सजविण्यात आले आहे. घरातील महिला वर्ग एकत्रित येऊन सजावटीत दंग झाला आहे. कोणी तळ्यावरील खड्ड्यांना गौरीच्या रूपात घरी आणले आहे. तर कोणी पानफुलांच्या रूपाने गौरीला घरी आणले आहे. काही ठिकाणी मुखवट्याच्या गौरीही विराजमान झाल्या आहेत. येथील रेश्‍मा गोसावी यांनी गौराईला केलेल्या आरासच्या माध्यमातून दुष्काळ मानव निर्मित की निसर्गनिर्मित यावर समाज प्रबोधन करून, लेक वाचवा, पाणी वाचवा व पर्यावरण वाचवा असा समाजाला संदेश दिला आहे. माधुरी गोसावी यांनी सांगितले की, गौरांईच्या आगमनामुळे घरात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण आहे. आपले माहेरचे कोणीतरी आले असे वाटते. त्यामुळे एक वेगळीच प्रसन्नता आली आहे. त्यामुळे या भागात गौरींची सजावट व आरास पाहण्यासाठी महिलांसह तरूणींची रात्री उशिरापर्यंत झुंबड उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)