सोनतळी परिसर विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकास शिबीराने फुलला

कोल्हापूर –   प्राथमिक शिक्षण समिती आणि महानगरपालिका कोल्हापूर आयोजित राष्ट्र सेवा दल यांच्या सहकार्याने महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास शिबीराचा शुभारंभ आज  प्राथमिक शिक्षण समिती सभापती  वनिता अशोक देठे यांच्या शुभहस्ते घ्वजारोहनाने झाला.शिबीराच्या  पहिल्या दिवशी सोनतळी येथे दाखल झालेल्या शिबीरार्थी विद्यार्थ्यांचे उपस्थित सर्व मान्यवरांनी स्वागत केले. तसेच त्यांना उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी टोप्यांचे देखील वाटप करण्यात आले.

या शिबीरात आयोजित बौध्दिक कार्यक्रमात विठ्ठल कोतेकर यांनी व्यक्तिमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन केले. त्याला विद्यार्थ्यांनी चांगला  प्रतिसाद दिला. यावेळी राष्ट्र सेवा दलाच्या वतीनं  विद्यार्थ्यांना लेझीम, झांज, ॲरोबिक्स, बर्ची इ. खेळांचे प्रात्याक्षिक दखवण्यात आले.तसेच यावेळी  राष्ट्रसेवा दलाचे  माजी अध्यक्ष, भरत लाटकर यांनी शिबीरार्थी विद्यार्थ्यांना प्रबोधनात्मक गीतांचे गायन करुन मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी तसेच प्रबोधनासाठी पथनाट्य देखील यावेळी सादर करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)