सोनजाई डोंगरावर श्री सोनजाई देवी नवरात्र उत्सवाचे आयोजन

मंदिराच्या विश्वस्तांच्यावतीने नवरात्र उत्सव काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन
वाई, दि. 9 (प्रतिनिधी) – सह्याद्रीच्या कड्या कपारीत हजारो फुट उंचीवर दोन समोर-समोर डोंगरावर सोनजाई देवीचे तर दुसऱ्या डोंगरावर मांढरदेवीचे मंदीर आहे. फार वर्षांपूर्वी पासून या देवींचे नवरात्र काळात मोठ्या भक्ती- भावाने नवरात्र उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. बावधनच्या उत्तरेला दोन हजार फुट उंच डोंगरावर सोनजाई देवीचे मंदीर आहे.वाई तालुक्‍यात मांढरदेवची श्री काळूआई, रेनावळे येथील श्री काळेश्वरी, ओझर्डे गावातील श्री पद्मावती, आसले गावातील तुळजा भवानी, भुईंज गावातील श्री महालक्ष्मी तसेच सोनजाई गडावर सोनजाई देवीचा जागर नवरात्रात केला जातो,सोनजाई देवीचे नवरात्र उत्सव साजरे करण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे.सोनजाई देवी देवस्थान व मंगल गिरी महाराजांच्या पुढाकाराने या ठिकाणी नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी धार्मिक विधींचे आयोजन करण्यात येते.यावर्षी बुधवार दिनांक 10 आक्‍टोंबर पासून नवरात्र उत्सवास सुरुवात होत असून दिनांक 17 रोजी नवरात्र समाप्ती होणार आहे. या नऊ दिवसांमध्ये दररोज पहाटे चार वाजता काकडा आरती, पाच वाजता पूजा आरती, सकाळी 6 ते 9 पर्यंत सप्तशती पठाण,व हवन, सकाळी 10 ते 12.30 पर्यंत श्रीमददेवीभागवत कथा, दुपारी 12.30 ते 4 पर्यंत भोजन व विश्रांती, दुपारी 4 ते 6 कीर्तन व संध्या आरती, रात्रो 9 ते 10 वाजता देवी जागर करण्यात येणार आहे.
बुधवारी- पहिल्या दिवशी- अखंड हरीनाम साप्ताहारंभ विनापूजन, श्रीधर महाराज खंदारे (आळंदी) यांचे कीर्तन, गुरुवारी दुसर्या दिवशी तुळशीराम महाराज बोरकर परभणी, यांचे कीर्तन, तिसऱ्या दिवशी मारुती महाराज निगडीकर निगडी, चौथ्या दिवशी राहुल महाराज मासाळवाडी बारामती, पाचव्या दिवशी, अनिकेत महारज कोपर्डे खंडाळा, सहाव्या दिवशी, सोपानदेव महाराज पिंपळेकर,उस्मानाबाद, सातव्या दिवशी सांदिपनी महाराज कडेगांव वाई, आठव्या दिवशी माधव बाबा इंगवले -काल्याचे कीर्तन होणार आहे. सर्व धार्मिक विधी आचर्य- विश्वनाथ खरे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहेत. प्रत्येक दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाच्या निमित्ताने स्थानिक भाविकांसह सातारा, पुणे जिल्ह्या,तसेच संपूर्ण राज्यातील भाविक सोनजाई देवीच्या दर्शनासाठी गडावर येत असतात. नवरात्र उत्सव काळात या ठिकाणी घटस्थापणे पासून संपूर्ण नऊ दिवस अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात संपूर्ण दिवसभर धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.दरम्यान सोनजाई देवीच्या गडावर शासनाच्या धोरणानुसार पशुहत्या बंदी असून भाविकांनी याचे काटेकोरपणे पालन करावे, तसेच मंदीर परिसरात स्वच्छता राखावी असे आवाहन मंगलगिरी महाराज व विश्वस्त यांनी केले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)