सोनगाव कचरा डेपो प्रश्न पुन्हा पेटला

कायमचे टाळे ठोकण्याचा ग्रामस्थांचा इशारा

सातारा – सातारा शहराजवळील सोनगाव कचरा डेपोतील पेटत्या कचऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रचंड धुराने पुन्हा एकदा वातावरण तापले . सोनगाव, जकातवाडी तसेच परिसरातील ग्रामस्थांनी सर्व घंटागाड्या डेपो बाहेरच अडवून गेटला टाळे ठोकल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी या बाबत तातडीने उपाय योजना न झाल्यास तिव्र आंदोलन केले जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला.

-Ads-

सोनगाव येथील कचरा डेपोतील कचरा सातत्याने पेटत असतो. आग आटोक्‍यात आणण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था देखील केली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे प्रदुषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. याचा परिणाम ग्रामस्थांच्या आरोग्यावरती दुरगामी स्वरूपात होतो. जकातवाडी, सोनगाव, डबेवाडी, शहापूर येथील ग्रामस्थांनी यावेळी पुन्हा एकदा कचरा डेपोमध्ये येणाऱ्या घंटा गाड्या अडवून ठेवल्या आणि आपला निषेध नोंदवला. सातारा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जाधव यांच्या मध्यस्तीने अनर्थ टळला. परिसरातील ग्रामस्थांना धुरामुळे कायमची घसादुखी खोकला, डोळे जळजळने व सर्दी अशा आजारांनी ग्रासले आहे.

नगरपरिषद साताराच्या आरोग्य विभागाच्या व्यवस्थापनाचा अभाव पुन्हा एकदा या निमित्ताने चव्हाट्यावर आला. कचरा डेपो मध्ये दैनंदिन स्वरूपात येणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नेमली आहे. दैनंदिन घंटागाड्या त्यांच्या फेऱ्या रजिस्टर मध्ये नोंद केल्या जातात, आगनियंत्रण करण्यासाठी पाण्याचे बंब, इतर खासगी गाड्या देखील बोलवल्या जातात. त्यांची देखील दैनंदिन नोंद करण्यात येत असते. मग याबाबत नक्की कोण दोषी आहे ? कुणाचा हलगर्जीपणा याबाबत होत आहे. याकडे सातारा नगराध्यक्ष माधवी कदम तसेच मुख्याधिकारी शंकर गोरे लक्ष देणार का असा प्रश्न देखील संतप्त ग्रामस्थ विचार आहेत.

यानिमीत्ताने कचरा डेपोला टाळे ठोकू असा इशारा जकातवाडीचे सरपंच चंद्रकांत सणस व सोनगावचे सरपंच पांडुरंग नावडकर यांनी दिला. यावेळी सकाळी 8 वाजताच डेपो बाहेरच घंटा गाड्या अडवून धरण्यात आल्या होत्या. मुख्याधिकारी, नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आरोग्य सभापती यांचा यावेळी निषेध केला.या प्रश्‍नाची दखल तातडीने न घेतल्यास तीव्र स्वरूपात आंदोलन केले जाईल. असा इशारा यावेळी सर्व ग्रामस्थांनी दिला. या वेळेस जकातवाडी सोनगाव ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कचरा डेपोतून मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वायू प्रदुषणा बाबत सातारा प्रदुषण नियंत्रण महामंडळाची भूमिका महत्वाची आहे. त्यांनी याबाबत सातारा नगरपरिषदेला कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी निर्देश देणे आवश्‍यक आहे.या प्रदुषणा बाबत प्रदुषण नियंत्रण महामंडळाने कोणत्या उपाययोजना केल्या आहेत. किंवा करणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यांच्या कडून सातारा नगरपरिषदेला पाठिशी घालण्याचा प्रकार तर होत नाही ना असा प्रश्न देखील ग्रामस्थांमध्ये चर्चेला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)