सोनके येथे अपघातात पादचारी जागीच ठार

पिंपोडे बुद्रुक – सोनके, ता. कोरेगाव येथे शुक्रवारी सायंकाळी दुचाकीने धडक दिल्याने पादचारी जागीच ठार झाला. मोहन गंगावणे असे मृत पादचाऱ्याचे नाव आहे. या अपघातात दुचाकीस्वारही गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मोहन हरिभाऊ गंगावणे (वय 68, रा. सोनके, ता. कोरेगाव) हे शुक्रवार, 23 रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सोनके येथील बेघरवस्ती परिसरातून घरी पायी जात होते.

यावेळी नांदवळवरुन पिंपोडे बुद्रुकच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वार रमेश पवार (वय 42) यांच्या दुचाकी (एमएच 11 एएक्‍स 9034) गाडीची गंगावणे यांना जोराची धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये गंगावणे यांना गंभीर दुखापत झाले. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने मोहन गंगावणे यांचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी त्यांनी जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वाठार स्टेशन पोलिसांनी घटनास्थळावरुन अपघाती दुचाकी ताब्यात घेतली. घटनेची नोंद वाठार स्टेशन पोलिस ठाण्यात झाली आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)