सोनईत बिबट्याकडून दोन कालवडींचा फडशा

सोनई – नेवासा तालुक्‍यातील सोनई गावालागतच असलेल्या घोडेगाव रोडवरील बजरंगनगर गडाख वस्तीत कुंडलिक नामदेव गडाख यांच्या घरासमोरील त्यांच्या सात जनावरांपैकी गोठ्या बाहेरील बांधण्यात आलेल्या दोन तेरा महिन्याच्या कालवडी बिबट्याने फडशा पाडला. हा प्रकार गडाख हे सकाळी उठल्यानंतर लक्षात आला. बिबट्याच्या हल्ल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामध्ये गडाख यांचे सुमारे तीस हजाराचे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनास्थळी वन अधिकारी ढेरे, जाधव, डॉक्‍टर मेहेत्रे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. पंचायत समिती सदस्य बाळासाहेब सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली. आजूबाजूला उसाचे मोठे पीक असल्याने त्यात महिन्यापासून वीज पुरवठा खंडित झाल्याने व त्यातल्या त्यात विद्युत रोहित्र चोरीला गेल्याचे समजते. त्यातच आता अंधाराचा फायदा बिबट्याने रात्री हल्ला केला. नुकसान भरपाई मिळावी व परिसरात पिंजरा लावावा अशी मागणी शेतकरी ज्ञानदेव गडाख यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)