सोनईत एलसीबीचा छापा; एकास अटक

सोनई – स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी रोजी दुपारी सोनई येथील हॉटेल मधुबनलगत विदेशी दारू विकणाऱ्या एका तरुणाला अटक केली असून त्याच्या विरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली अधिक माहिती अशी, की स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सोनई परिसरात गस्त घालत होते. एका खबऱ्याने पोलीस नाईक संदीप घोडके व पोलीस नाईक सचिन मिरपगार यांना खात्रीशीर माहिती दिली, की बसस्थानक परिसरातील हॉटेल मधुबनच्या पाठीमागील भिंतीलगत एक तरुण बेकायदा विदेशी दारू विक्री करत आहे. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना ही माहिती दिली. सोनई पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी आव्हाड व थोरात यांना मदतीला घेऊन खबऱ्याने माहिती दिल्यानुसार दोन पंचासमवेत प्रत्यक्ष पाहणी केली. तेथे एक तरुण समोर बॉक्‍स घेऊन विदेशी दारूच्या बाटल्या विकताना दिसला. त्याला ताब्यात घेतले. संजय भागवत वाघमारे (वय 42, रा. दरंदले गल्ली सोनई) असे त्याचे नाव असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. त्याच्या ताब्यातून 1300 रुपये किमतीच्या निरवाना कंपनीच्या 12 बाटल्या, 1350 रुपये किमतीच्या मास्टल लॉड 10 बाटल्या, 700 रुपये किमतीच्या इंपिरियलच्या पाच बाटल्या, 1050 रुपये किमतीच्या ऑफिसर चॉईसच्या पाच बाटल्या, 1680 रुपये किमतीच्या गोवा जीत सात सीलबंद बाटल्या जप्त केल्या. पकडलेल्या मद्याच्या बाटल्या सोनई पोलिसांनी प्रयोगशाळेत पाठविल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक संदीप घोडके यांच्याफिर्यादी नुसार आरोपी संजय भागवत वाघमारे (वय 42) रा. सोनई यांचे विरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात मुंबई प्रोव्हिजन कायदा 65(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणात गावठी व देशी दारूची विक्री होत आहे मात्र त्यावर कधी कार्यवाही झाल्याचे एकवत नाही तसेच गागथडी परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारूची विक्री होत असल्याचे समजते त्यावर स्थानिक गुन्हे शाखा कारवाई करणार का ?

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)