सोनईच्या वॉर्ड2साठी 25 ला मतदान

सोनई – नेवासा तालुक्‍यातील सोनई ग्रामपंचायतच्या वॉर्ड2 साठी 25 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. सुरेखा साळवेजिल्हा परिषद सदस्या झाल्यानेही जागा रिक्‍त झाली होती. वॉर्ड2 च्या निवडणुकीसाठी 5 ते 10 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. 12 रोजी अर्जाची छाननी होणार आहे. 15 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. 25 फेब्रुवारीला मतदान होऊन 26 तारखेला मतमोजणी होईल. ही जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. निवडून येणाऱ्या सदस्याला दोन वर्षासाठी काम करण्याची संधी मिळणार आहे. मागील निवडणुकीत क्रांतिकारी पक्षाच्या उमेदवार सुरेखा साळवे, अपक्ष सचिन पवार, संतोष तेलोरे यांच्यात लढत होऊन साळवे विजयी झाल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)