सोनं-चांदीच्या दरात वाढ

नवी दिल्ली : लग्न सराईचा काळ सुरु झाला असतानाच आता सोनं-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. स्थानिक बाजारांत ज्वेलर्सकडून होणारी मागणी यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत १०० रुपयांनी वाढ झाल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे आता १० ग्रॅम सोन्याचा दर ३०,७५० रुपयांवर पोहोचला आहे.

चांदीची मागणी वाढल्यामुळे चांदीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीच्या दरात १०० रुपयांनी वाढ झाल्याने चांदी ३९,७५० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे. व्यापाऱ्यांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात इतर मुद्रांच्या तुलनेत डॉलरची किंमत थोडी घसरली आहे. तसेच स्थानिक बाजारांत ज्वेलर्सकडून होणारी मागणी वाढली आहे त्यामुळे सोन्याच्या आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)