सोड ना अबोला …!!!

या वर्षभरात घडलेली हि कथा. ‘तो ‘ व ‘ती’ एकाच Team मध्ये असूनही त्यांना एकमेकांचा अस्तित्वाची जाणीवही नव्हती , फक्त “नाम’ ओळख. Team ची seating arrangement मध्ये बदल झाला अन “ती’ व “तो’ एकमेकांच्या बाजूला येऊन बसले. दोघांचं बोलणं ही केवळ कामापुरतंच . “तो’ Computer मध्ये डोकं घालून काम करणारा ..अन “ती’ कोणत्याही विषयावर कोणाशीही सतत बडबड करणारी एखाद्या अल्लड लहान मुलासारखी… एखादा प्रश्न आलाच तर “ती’ त्याला विचारणार ..ते समजावून सांगताना तोच दमही भरणार “आत्ताच समजावून घे, पुन्हा हाच प्रश्न विचारायचा नाही’. त्याचा अशा बोलण्यामुळे ती त्याच्या पासून चार हात दूरच…

पण आता तिच्या “व्यर्थ बडबडी’ची त्यालाही सवय झाली होती. तिच्या प्रत्येक चर्चेत आता “तो’ भाग घेऊ लागला. “ती’ने एखादा विषय सुरु करावा अन त्याने त्याविरोधात मजेदार फटकारे सुरु करावेत. या चर्चेत टीमचे इतरही सहभागी होऊ लागले. संपूर्ण टीम साठी “ते’ दोघेही Tom & Jerry झाले होते. “तुम्ही’ ही आदरार्थी हाक आता “अरे तू’ वर आली होती. दोघेही Team picnic , party एकमेकांसोबत मस्त enjoy करत होते.

असेच एका संध्याकाळी गप्पा गोष्टी करत ती त्याचा desk जवळ आली अन अचानक म्हणाली , ‘ I have feelings for you…तुला काय वाटत माझ्याविषयी ? ‘ तो पुरता गडबडलाच. काही काळ पूर्ण जगचं स्तब्ध झालं आहे ..मन सुन्न झाल्यासारखं त्याला वाटत होतं. पहिल्या एकतर्फी प्रेमभंगातून सावरतो न सावरतो तोच …हा यक्ष प्रश्न … ??? ठराविक काळाने “ती’ तो एकच प्रश्न विचारायची … अन प्रत्येक वेळी त्याचा मनात ही एकच द्वंद्व असायचं …. ‘ Conscious Mind “हो’ तर ‘ Subconscious Mind ‘ नकारार्थी’ उत्तर द्यायचं. या लढ्यात प्रत्येक वेळी Subconscious Mind चाच विजय व्हायचा .

सबंधित लेखप्रेमावर बोलू काही…  प्रेम हे प्रेम असतं…

नंतरही Tom & Jerry चे मजेशीर वाद -विवाद सुरूच असायचे. मानसिक तणाव कमी करण्याचा दोघांसाठी हाच योग्य उपाय होता पण मनातील अस्वस्थता लगेच कळून येत होती. या मानसिक स्थितीतून बाहेर तरी कसे पडायचे? अखेर तिनेच उपाय शोधला “न बोलण्याचा’. नववर्षात नवीन संकल्प “त्याच्याशी’ न बोलण्याचा. शक्‍यतो नवसंकल्प “संक्रांती’ पर्यंतच टिकतो पण अजून तरी तिने तो राखला आहे.

सामान्यपणे हा प्रश्न सर्वांसमोरच येऊ शकतो “तुला माझ्याविषयी feelings आहेत का?’ यावर “हो’ अथवा “नाही’ हे दोनच पर्याय आहेत का ?दोघांनाही भावनिक ठेच न लागता मैत्रीचे नाते जपण्याचा मध्यम मार्ग नाहीच का ? जे नातं असेल निखळ मैत्रीचं … दोघांनाही भावना व्यक्त करण्याचा अधिकार असेल, एकमेकांना सावरून घेण्याचा, मानसिक गुंतागुंतीमधून नात्याचा नाजूक धागा अलगद सोडविण्याचा प्रयत्न असेल .

“तो’ तिच्यासाठी ‘Hero ‘होऊ शकणार नाही, पण त्याला तिच्या जीवनात ‘Villain’ ही बनायचे नाही ….. या Valentine’s day ला तरी हे मौनव्रत ती सोडेल अशीच त्याची इच्छा आहे ..

सध्या तरी “तो’ एकच गाणं गुणगुणत असतो…

“हा रुसवा सोड सखे , पुरे हा बहाणा ….सोड ना अबोला … !!!

संकेत कोरडे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)