सोडतीवर बहिष्कार टाकून कामकाज पाडले बंद

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या “ड’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत फेरीवाला जागा वाटपाबाबत चिठ्ठी पद्धतीने सोडत काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, हे बेकायदेशीर व नियमबाह्य असल्याने ते रद्द करावे अशी मागणी केली.

महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, शहर फेरीवाला समिती सदस्य व टपरी पथारी हातगाडी पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी त्याल तीव्र विरोध करत या सोडतीवर बहिष्कार टाकत ही सोडत बंद पाडली. महापालिकेने 2014 साली हॉकर्स झोनसाठी 247 जागांपैकी 70 टक्के जागा निश्‍चित केल्या होत्या बाकीच्या निश्‍चित होणे महत्त्वाचे असताना अनेक जागांवर सदस्यांनी आक्षेप नोंदवला असताना व शहर फेरीवाला समितीची परवानगी न घेता जागा वाटपाचा निर्णय चुकीचा आहे, असा आरोप महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी केला


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)