“सॉरी’ शब्दाची जादू अनोखी

एखाद्या वेळी अगदी जवळच्या व्यक्तीकडून अतिपरिचयात अवज्ञा’ या उक्तीला अनुसरून एखादा प्रमाद घडतो. अपेक्षा नसताना अंगावर आलेल्या या परिस्थितीमुळे आपणही गांगरून जातो. अशा वेळी अगदी जवळच्या व्यक्तीलाही माफ करणे कठीण होऊन बसते आणि असे प्रसंग अनेकदा कुटुंबात महिलांच्या वाटयाला अधिक येतात, मग असे प्रसंग कधी कार्यालयात फेस करावे लागतात. याकरिताच एखाद्याला आपल्याकडून दुखावले गेले असेल अगदी अनवधानाने तरी आवर्जून माफी मागा. कदाचित तुमच्या सॉरी म्हणण्याने तुमचे नाते अधिक पक्के होईल.

“आय एम सॉरी’ या शब्दात काय ताकद आहे याचा अनुभव प्रत्येकजण कधी ना कधी घेतोच. माफ करणं, एखाद्याच्या चुकांकडे दुर्लक्ष करून चांगल्या गुणांकडे लक्ष देणं, एखाद्याला मैत्रीचा हात देणं यामध्ये किती सुख दडलंय हे अनुभवल्याशिवाय कळणार नाही. “मी चुकले अथवा मी चुकलो’ हे दोन शब्द काय करिश्‍मा करतात! या दोन शब्दांमुळे बिघडलेले नातेसंबंध झटक्‍यात सुधारतात. एकदा हे रेशमी बंध जुळले की त्या गाठी आयुष्यभराच्या होऊन जातात. म्हणूनच शक्‍य असेल तेव्हा या दोन शब्दांचा वापर करायला हवा.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)