सॉफ्टबॉल लीग स्पर्धेचे सार्थक कॉर्पोरेशन संघाला विजेतेपद

अंतिम लढतीत अॅमनोरावर 7-0ने मात : दीपक कुमार ठरला ‘सर्वोत्तम खेळाडू’

पुणे – सुनील राज व दीपक कुमार यांच्या दमदार खेळाच्या जोरावर सार्थक कॉर्पोरेशन संघाने अॅमनोरा संघाला 7-0 होमरन्सने पराभूत करताना ‘एएवाय’स सॉफ्टबॉल अकादमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहाव्या सॉफ्टबॉल लीग स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

अंतिम लढतीत सार्थक कॉर्पोरेशनच्या सुनील राजने 2 होमरन्स करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याला दीपककुमार, भूपेंद्र कुमार, सारंग नेतम, सोनू कुमार व अमित देशमुख यांनी प्रत्येकी 1 होमरन्स करत सुरेख साथ दिली.

-Ads-

तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीमध्ये मोहोर संघाने अनिब्रेन संघाला 15-1 असे एकतर्फी पराभूत केले. मोहोर संघाकडून अभिषेक सोलोकर, आशिष झिंगटे, चेतन महाडिक, अक्षय खुडवे, प्रणव दंदले, हर्षद जमालकर व दीपक खंदारे यांनी प्रत्येकी 2 होमरन्स करताना संघाला विजय मिळवून दिला. अनिब्रेन संघाकडून प्रीतेश पाटीलने 1 होमरन्स करताना चांगली लढत दिली.

स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार दीपककुमार याने पटकाविला. स्पर्धेचा बक्षीस वितरण सिटी ग्रुपचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, किर्लोस्कर ऑईल इंजिन्सचे व्यवस्थापकीय सहसंचालक आर. आर. देशपांडे, मोहोर ग्रुपचे संचालक भरत देसडला, मध्यवर्ती कारागृहाचे उपअधीक्षक मिलिंद कुर्लेकर, सार्थक कॉर्पोरेशनचे संचालक विक्रम चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी वोडाफोनच्या मोहना मांजरे, राष्ट्रीय खेळाडू मुकेश तांबोळी, “एएवाय’स सॉफ्टबॉल अकादमीचे अध्यक्ष अजय राणे, राजेंद्र मिसाळ, नागेश पालकर, श्रीधर धुमाळे, योगेश नाईक, मंगेश पटवर्धन, हेमंत फाटक, अर्चना राणे, राखी शेजवलकर, अनिरुद्ध शर्मा, राकेश गायकवाड, अतुल शिंदे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)