सॉफ्टबॉल लीग स्पर्धा: व्होटेक्‍सा, एस.के.डेव्हलपर्स, सार्थक कोर्पोरेशन संघांची आगेकूच कायम

पुणे: व्होटेक्‍सा बॅटरीज, एस. के. डेव्हलपर्स, सार्थक कोर्पोरेशन संघांनी आपल्या प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करताना येथे सुरू असलेल्या एएवायएस सॉफ्टबॉल अकादमी व सिस्का एलइडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सॉफ्टबॉल लीग स्पर्धेतील आपली आगेकूच कायम राखली.

स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर सुरु असलेल्या स्पर्धेत व्होटेक्‍सा बॅटरीज संघाने एस. जी. व्हेंचर्स संघाला 11-1 होमरन्स असे एकतर्फी पराभूत करताना स्पर्धेतील आपली आगेकूच कायम राखली. जयेश मोरे, अभिजित सोनावणे, हेमंत मोहिते, निखील कोल्हे यांनी संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अतुल रावत, अमित बहादूर हे एसजी व्हेंचर्स संघाला पराभवापासून वाचवू शकले नाहीत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एस के डेव्हलपर्स संघाने मुकुल माधव फाउंडेशन संघाला 4-0 होमरन्सने पराभूत केले. विनायक यादव, प्रवीण दवे, विक्रम ठाकूर यांनी संघाला विजय मिळवून दिला. पियुष चांदेकर, अक्षय मोरे, हर्ष गायकी यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. चेतन जोगळेकर, आदर्श बांगडे, प्रथमेश वाघ यांच्या दमदार खेळाच्या जोरावर मोहर संघाने चॅम्पियन युपीएस संघाला 5-2 होमरन्सने पराभूत केले. चॅम्पियन युपीएस संघाचे प्रतीक गाडेकर, आशिष मेहेत्रे, तेजस कुलकर्णी संघाला विजय मिळवून देण्यास अपयशी ठरले. सार्थक कोर्पोरेशन संघाने रचना लाईफस्टाईल संघाला 8-4 असे पराभूत करताना स्पर्धेतील आपली आगेकूच कायम राखली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)