सॉफ्टबॉल लीग स्पर्धा; ऍमानोरा, सार्थक कॉर्पोरेशन, चॅम्पियन यूपीएस संघांची विजयी सलामी

पुणे – सार्थक कॉर्पोरेशन संघाने सिस्का एलईडी संघाला, तर ऍमानोरा संघाने फिनोलेक्‍स पाईप्स संघाला पराभूत करताना एएवाय’ज सॉफ्टबॉल अकादमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सॉफ्टबॉल लीग स्पर्धेत विजयी सलामी दिली.
स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात ऍमानोरा संघाने फिनोलेक्‍स पाईप्स संघाला 1-0 होमरन्सने पराभूत करताना विजयी सलामी दिली. ऍमानोरा संघाकडून हितेश व क्रिशन यांनी चमकदार कामगिरी बजावताना संघाच्या विजय मिळवून दिला. फिनोलेक्‍स संघाकडून राहुल बाबस यांने दिलेली झुंज अपुरी ठरली.
दुसऱ्या सामन्यात सार्थक कॉर्पोरेशन संघाने सिस्का एलईडी संघाला 6-0 होमरन्सने पराभूत केले. सार्थक कॉर्पोरेशन संघाकडून सुनील, व्ही. मोहन यांनी प्रत्येकी 2 होमरन्स तर, आशिष व सारंग यांनी प्रत्येकी 1 होमरन्स करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

तिसऱ्या लढतीत चॅम्पियन यूपीएस संघाने फिनोलेक्‍स पाईप्स संघाला 3-2 असे पराभूत करताना आपली आगेकूच कायम राखली. चॅम्पियन यूपीएस संघाकडून गौरव राजापुरे, श्रीकांत मारटकर व अक्षय साठे यांनी प्रत्येकी 1 होमरन्स करताना संघाला विजय मिळवून दिला. फिनोलेक्‍स पाईप्सच्या सिद्धार्थने चांगली लढत दिली.

-Ads-

आणखी एका एकतर्फी ठरलेल्या सामन्यात अनिब्रेन संघाने रचना लाईफस्टाईल संघाला 11- 1 अशा फरकाने पराभूत केले. विजयी संघाकडून कल्पेश कोल्हे, सुमेध तळवळेकर, अक्षय येवले, पवन यांनी प्रत्येकी 2 तर, निखिल कोल्हे, प्रीतीश पाटील, सागर पाटील यांनी प्रत्येकी 1 होमरन्स करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. रचना लाईफस्टाईल्स संघाच्या राकेश गायकवाडने चांगली लढत दिली.

त्याआधी स्पर्धेचे उदघाटन जीएसटीचे सहाय्यक आयुक्‍त आर. आर. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी यावेळी सहाय्यक आयुक्‍त अविनाश चव्हाण, आयकर अधिकारी श्री. श्रीकांत पांडे, सिस्का एलईडीचे संचालक राजेश उत्तमचंदानी, बीव्हीजीचे उपाध्यक्ष उमेश माने, स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शेठ, सार्थक कॉर्पोरेशनचे सुनील चव्हाण, एस. के. ग्रुपचे सचिन चव्हाण, शिक्षण प्रसारक मंडळीचे रणजीत नातू, एएवाय’ज सॉफ्टबॉल अकादमीचे अध्यक्ष अजय राणे, श्रीधर डूमाले, नागेश पालकर व राजेंद्र मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)