सॉफ्टबॉल लीग स्पर्धा; ऍमनोरा, अनिब्रेन, सार्थक कॉर्पोरेशन, मोहोर उपान्त्य फेरीत

पुणे – ऍमनोरा, अनिब्रेन, सार्थक कॉर्पोरेशन व मोहोर या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करताना सॉफ्टबॉल लीग स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत प्रवेश केला.एएवाय’ज सॉफ्टबॉल अकादमीच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेतील उपान्त्यपूर्व फेरीच्या पहिल्या सामन्यात सार्थक कॉर्पोरेशन संघाने चॅम्पियन यूपीएस संघाला 9-0 असे एकतर्फी पराभूत करताना उपान्त्य फेरीत प्रवेश केला. सार्थक कॉर्पोरेशन संघाकडून पी. आशिषकुमार व सुनील राज यांनी प्रत्येकी 2 होमरन्स केले. तसेच व्ही. मोहन राव, मानस केशरवानी, दीपककुमार, भूपेंद्र कुमार व सारंग नेतम यांनी प्रत्येकी 1 होमरन करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. चॅम्पियन यूपीएस संघाकडून एकाही होमरनची नोंद झाली नाही.

-Ads-

आणखी एका सामन्यात ऍमनोरा संघाने सिस्का एलईडी संघाला 3-0 असे पराभूत केले. हितेशकुमार, निखिलकुमार व व्ही. जयेश यांनी प्रत्येकी 1 होमरन करताना संघाला विजय मिळवून दिला. सिस्का एलईडी संघाचा गोलफलक कोराच राहिला.
उपान्त्यपूर्व फेरीतील तिसऱ्या लढतीत अनिब्रेन संघाने कुमार प्रॉपर्टीज संघाला 5-2 असे पराभूत करताना स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत प्रवेश केला. अनिब्रेन संघाच्या प्रीतेश पाटीलने 2 होमरन्स, तर कल्पेश जाधव, जयंत जाधव, गौरव चौधरी यांनी प्रत्येकी 1 होमरन करताना संघाला विजय मिळवून दिला. कुमार प्रॉपर्टीज संघाकडून रणजीत शर्मा व बादल आव्हाड यांनी प्रत्येकी 1 होमरन केले, परंतु त्यांनी दिलेली लढत संघाला पराभवापासून वाचवू शकाली नाही.

आजच्या चौथ्या सामन्यात मोहोर संघाने एस. के. डेव्हलपर्स संघाला 4-0 असे पराभूत करताना आपली विजयी मालिका कायम राखली. मोहोर संघाकडून चेतन महाडिक, अक्षय खुडवे, प्रणव दादले व हर्षद जामालकर यांनी प्रत्येकी 1 होमरन करताना संघाला विजय मिळवून दिला. एस. के. डेव्हलपर्स संघाकडून एस.श्रीनिवासने दिलेली लढत अपुरी ठरली.
सविस्तर निकाल-

उपान्त्यपूर्व फेरी-

1) सार्थक कॉर्पोरेशन 9 (पी. आशिषकुमार व सुनील राज प्रत्येकी 2 होमरन्स) वि.वि. चॅम्पियन यूपीएस संघ 0,
2) ऍमनोरा संघ 3 (हितेशकुमार, निखिलकुमार व व्ही. जयेश प्रत्येकी 1 होमरन) वि.वि. सिस्का एलईडी संघ 0,
3) अनिब्रेन संघ 5 (प्रीतेश पाटील 2 होमरन्स, कल्पेश जाधव, जयंत जाधव, गौरव चौधरी प्रत्येकी 1 होमरन) वि.वि. कुमार प्रॉपर्टीज संघ 2 (रणजीत शर्मा व बादल आव्हाड प्रत्येकी 1 होमरन), 4) मोहोर संघ 4 (चेतन महाडिक, अक्षय खुडवे, प्रणव दादले व हर्षद जामालकर प्रत्येकी 1 होमरन) वि.वि. एस. के. डेव्हलपर्स संघ 0.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)