सैयामी खैर परत जोडली गेली मुळाशी

सैयामी खैरने दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या मिरझिया पासून बॉलीवुडमध्ये तारकीय पदार्पण केले, त्यानंतर सैयामी आता सज्ज झालीये रितेश देशमुखच्या मराठी चित्रपट ‘माउली’मधून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करायला.

अभिनेत्री माउली मुळे पहिल्यांदा रितेशबरोबर स्क्रीन स्पेस शेयर करत असून, तिच्या भूमिकेसाठी परत मुळाशी जोडली गेली आहे. मनोरंजक गोष्ट म्हणजे, बऱ्याच जणांना हे ठाऊक नाही की सैयामी मराठी अभिनेत्री उषा किरण यांची नात आहे आणि माउली हा तिचा पहिला मराठी चित्रपट असल्यामुळे सैयामीने पूर्ण तयारी केली असून, जरा ही उणीव ठेवली नाही. एवढेच नव्हे सैयामीने तिच्या आजीचे बरेच चित्रपट पहिलेत खासकरुन गाजलेले पाहिलेत जेणेकरुण तिला माउलीसाठी मदत होईल. आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे अभिनेत्री तन्वी आज़मी ह्या सैयामीची अत्त्या आहे आणि त्यांनी रितेश सोबत मराठी चित्रपट “लय भारी” केला आहे आणि त्यामध्ये आईची भूमिका निभावली होती.

-Ads-

सैयामी म्हणते, “माझी आजी उषा किरण आणि त्यांच्या कामाची मी एक मोठी प्रशंसक आहे आणि यांच्या बद्दल मला खूप आदर आहे. मला त्यांच्याकडून खूप काही शिकायला आवडले असते. मी त्यांचे चित्रपट पाहून बरेच काही शिकले आहे आणि मला आशा आहे की मी त्यांच्या नावाचा आदर राखेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)