सैफ अली खान साकारणार कॅन्सर पेशंटचा रोल

 

सैफ अली खान एखाद्या “ब्लॅक कॉमेडी’मध्ये काम करताना यापूर्वी बघितल्याचे आठवत नसेल. मात्र अक्षत वर्माच्या “काला कंदी’च्या निमित्ताने तो प्रथमच “ब्लॅक कॉमेडी’ साकारणार आहे. या सिनेमामध्ये एक सोडून तीन वेगवेगळ्या स्टोरीज असणार आहेत. मुंबईत एकाच रात्री घडलेल्या या तीन कथांचे एकत्रित सादरीकरण म्हणजे “काला कंदी’ असणार आहे. यामध्ये सैफ एका कॅन्सर रुग्णाचा रोल साकारणार आहे. जेंव्हा हे वास्तव त्याला समजते तेंव्हा हबकून गेलेला हा हिरो अखेर आपल्या भावाच्या विवाहापर्यंत जीवनाशी झगडा करण्याचा निर्णय घेतो, अशी सैफसंबंधातली कथा आहे. सिनेमाच्या स्टोरी रिडींगच्यावेळी त्याने आपल्या या पुढील सिनेमाविषयी अधिक माहिती दिली. “काला कंदी’ हा “दिल्ली बेल्ली’ पेक्षा खूपच वेगळा सिनेमा असणार आहे. “काला कंदी’मध्ये सैफबरोबर अक्षय ओबेरॉय असणार आहे. यापूर्वी पिझ्झा, फितूर, लाल रंग बरोबर पिकूमधला छोटासा रोलपण अक्षयने केला होता.
सैफकडे सध्या बरेच सिनेमे आहेत. कंगणा आणि शाहिद कपूरबरोबरचा “रंगून’ तर आता काही दिवसात रिलीज होईल. त्याशिवाय राजा मेननचा “शेफ’ चे शूटिंगही सुरू आहे. त्याशिवाय “जुगलबंदी’ही सैफने स्वीकारला आहे. याशिवाय आनंद राय यांच्याही एका सिनेमामध्ये काम करण्याचे सैफने मान्य केले आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन नवदीप सिंग करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)