सैफच्या मते बॉलीवूड म्हणजे डस्टबीन

सैफ अली खान आणि राधिका आपटेच्या “बाजार’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. त्यावरून सैफच्या रोलविषयी आणि एकूणच सिनेमाच्या कथानकाविषयी कल्पना येऊ शकते. मात्र बॉलीवूडमध्ये दोन दशकांपेक्षा अधिक काळ घालवलेल्या सैफ अली खानने बॉलीवूडला उद्देशून “डस्टबीन’ असे म्हटल्याचे समोर आले आहे. सैफच्या या वक्‍तव्यावरून मोठा गदारोळ होण्याचीही शक्‍यता आहे. नवाब सैफ अली खानने आपल्या प्रतिष्ठेला न साजेसे असे हे वक्‍तव्य का केले. त्याला अशाप्रकारे थेट आणि बिनधास्त स्टेटमेंट का करावेसे वाटले, हा एक गूढ प्रश्‍न आहे.

“बाजार’च्या ट्रेलर रिलीज करण्याच्यावेळी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारत असताना सैफने हे मत मांडले. आम्ही फिल्म स्टार खरे तर खूपच लहान आहोत. खरा मोठा खेळ तर अन्य लोकच खेळत असतात आणि आम्हाला त्या खेळाविषयी काहीच माहिती नसते, असे सैफ म्हणाला. समाजातल्या घटनांचे प्रतिबिंबच सिनेमात दिसत असते, असे म्हटले जात असते. मात्र सिनेतारकांचा मीडियावाल्यांकडून सरळ सरळ वापर केला जात असतो, हे देखील या स्टार्सच्या ध्यानात येत नाही, असे त्याने स्पष्ट केले. लोक आपल्या न केलेल्या कतृत्वाबाबत बढाया मारत असतात आणि लोक पण त्या गोष्टींकडे हसून बघत असते. वाट्टेल तो कचरा खपवण्याचे ठिकाण झाले आहे बॉलीवूड. हे बॉलीवूड म्हणजे “डस्टबीन’ नाही तर आणखी काय आहे. ही खरे तर एक दुर्दैवाची बाब आहे, असे सैफने सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ही खरे तर खूप अजीब आणि तितकीच वाईट स्थिती आहे. सिनेमातील वाईट गोष्टींच्या आधारे मनोरंजन करून घेणाऱ्या लोकांनी खरे तर समाजातील खऱ्या खुऱ्या वाईट लोकांवर टीका करायला पाहिजे, असेही तो म्हणाला.

आपण सिनेमात काम करायला जरी पैसा हे पहिले कारण होते, तरी आता आपण पैशासाठी सिनेमात काम करत नाही. आता ज्या गोष्टी करण्यात आनंद मिळेल, तशाच सिनेमात काम करायला आपले प्राधान्य असेल. अभिनयातील प्रयोग आता केवळ आनंदासाठी असेल, असेही त्याने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)