सैफचा “नवाबी’ थाट 

मुंबई – बॉलिवूडमध्ये सैफ अली खान हा “नवाब’ म्हणून ओळखला जातो. त्याची लोकप्रियता सेक्रेड गेम्समुळे बरीच वाढली आहे. लवकरच त्याचा “बाजार’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच सैफ “जीक्‍यू’ या सुप्रसिद्ध मॅक्‍झिनच्या कव्हरपेजवर झळकला आहे. त्याच्या या खास दिमाखदार लूकचा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
सैफचा खास अंदाज सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या फोटोत पाहायला मिळत आहे. लवकरच सैफचा आगामी “बाजार’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर अलिकडेच प्रदर्शित करण्यात आला होता. सैफचा नवा लूक या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाला. या चित्रपटातील “केम छो, मजा मां…’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले होते.
शेअर मार्केटवर आधारित “बाजार’ हा चित्रपट असून मराठमोळी राधिका आपटे आणि चित्रांगदा यांचीदेखील यात महत्त्वाची भूमिका आहे. राधिका सैफसोबत याआधी “सेक्रेड गेम्स’मध्ये झळकली होती. सैफ चित्रपटात एका शेअर ब्रोकरची व्यक्तीरेखा साकारणार आहे. हा चित्रपट एक वेगळा आशय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गौरव चावला यांनी केले असून येत्या ऑक्‍टोबरला हा चित्रपट प्रदर्शित केला जाईल.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)