सैन्याच्या वर्चस्वामुळेच पाक अपयशी राष्ट्र – ब्रिटिश थिंक टँक

लंडन : पाकिस्तानात लोकशाहीच्या मार्गातून निवडून आलेले सरकार असले तरीही सत्तेवरील सैन्याचे वर्चस्व लपून राहिलेले नाही. लंडनचे प्रसिद्ध थिंक टँक द डेमोपेटिक फोरमने ‘इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल पॉवर ऑफ द मिलिट्री’ नावाचे चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्रात सैन्याच्या वर्चस्वामुळेच पाकिस्तान अपयशी राष्ट्र ठरल्याचे मानले गेले.

या चर्चासत्रात पाकिस्तान, म्यानमार, तुर्कस्तान आणि इजिप्तबद्दल चर्चा करण्यात आली. 2017 च्या लोकशाही निर्देशांकात चारपैकी कोणत्याही देशाल 10 पैकी 5 पेक्षा अधिक गुण मिळाले नव्हते. राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित विषय विश्वासार्ह असणाऱयांना सोपविले जातील असे पाकिस्तानी सैन्य नेहमीच सांगत असल्याचा दावा एका तज्ञाने केला.

पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवादी गटांमधील संबंधांवर देखील चर्चा झाली. यावेळी माजी राष्ट्रपती जनरल परवेज मुशर्रफ यांचा देखील उल्लेख करण्यात आला. 2002 मध्ये अमेरिकेच्या दडपणामुळे मुशर्रफ यांनी लष्कर-ए-तोयबावर बंदी घातली, परंतु नोव्हेंबर 2017 मध्ये याच संघटनेला पाकिस्तानच्या सर्वोत्तम संघटनांपैकी ठरविण्यात आल्याचा उल्लेख चर्चासत्रात झाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)