सैनिक पत्नीची सहा लाखांची फसवणूक

बिल्डरवर गुन्हा
फलटण, दि. 13 (प्रतिनिधी) – जाधववाडी, फलटण येथील सक्षम रेसिडन्सीमध्ये फ्लॅट देतो असे म्हणून नोटरी करून महिलेची सहा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सौ. सुरेखा जाधव रा. कापशी यांचे पती सैन्यात आहेत. एप्रिल 2017 मध्ये पती देवीदास जाधव रजेवर आले असता त्यांना फलटण शहरात सक्षम रेसिडन्सी जाधववाडी येथे अपार्टमेंटमध्ये फ्लॅट विक्रीस असल्याचे समजले. जाधव दांपत्यास नितीन महादेव भोसले रा. विद्यानगर फलटण या बांधकाम व्यावसायिकाने बिरदेवनगर जाधववाडी ता. फलटण येथे जाऊन फ्लॅट दाखवला. यानंतर शिंगणापूर रोड फलटण येथील ऑफिसला बोलवून घेतले. यावेळी 19 लाख रुपयांना फ्लॅटचा व्यवहार ठरला. नितीन भोसलेला त्यावेळी 1 लाख दिले त्याबदल्यात जाधव यांना पैसे मिळाल्याची पावती दिली. दि. 12 मे 2017 रोजी फ्लॅटच्या व्यवहाराची नोटरी सुरेखा जाधव यांना नितीन भोसलेने करून दिली. त्यानंतर जाधव यांनी वेळोवेळी 5 लाख दिले. दिलेल्या रकमेबाबत पैसे जमा पावती दिली गेली होती. काही दिवसानंतर जाधव यांना नितीन भोसलेने दिलेला फ्लॅट दुसर्‍या व्यक्तीस विकल्याचे यांना समजले. यानंतर जाधव यांनी ठरलेल्या फ्लॅटबाबत वेळोवेळी भोसले यांना दिलेले एकूण रक्कम 6 लाख मागितले असता पैसे देण्यास टाळाटाळ केली. बिल्डर नितीन भोसलेले नोटरी करूनही 6 लाखांची फसवणूक केली असल्याचे लक्षात आल्यानंतर सौ. सुरेखा जाधव यांनी त्याच्याविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)