सैनिकांसाठीच्या योजनाच माहित नाहीत

कर्नल एच. के. कोचर यांची खंत ः मंचरमध्ये वीरपत्नींचा सत्कार

मंचर-पेन्शन, वैद्यकीय सेवा माजी सैनिकांना मिळत आहे; परंतु केंद्र सरकारच्या विविध योजना माजी सैनिकांसाठी असून त्यांची माहिती माजी सैनिकांना नाही. अशी खंत कर्नल एच. के. कोचर यांनी व्यक्त केली.
मंचर येथे आंबेगाव, जुन्नर तालुक्‍यातील माजी सैनिकांच्या मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना कर्नल एच. के. कोचर बोलत होते. यावेळी कर्नल अतुल बिन्द्रा, अक्षय राणा, सरपंच दत्ता गांजाळे, आंबेगाव तालुका माजी सैनिक संघाचे अध्यक्ष रविंद्र थोरात, तानाजी कोरडे, यशवंत गांजाळे, कृष्णा गव्हाणे, दिलीप हिंगे, देविदास भुजबळ, छबन ठोंबरे यांच्यासह माजी सैनिक उपस्थित होते. माजी सैनिकांनी देशसेवेसाठी आपले आयुष्य वेचले; परंतु त्यांनी सेवानिवृत्तीनंतर आपला वेळ कुटुंबासाठी द्यावा. आरोग्य संपदा व्यवस्थित राखण्यासाठी नियमित व्यायाम करुन शरीर स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन कर्नल एच. के. कोचर यांनी केले. सुभेदार विजय झुंजा, एम. पी. मनोप्पा, भाजपाचे तालुकाध्यक्ष संजय थोरात, मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे यांनी मेळावा घेण्यासाठी सहकार्य केले. तसेच यावेळी मोफत वैद्यकीय तपासणी आणि औषधांचे वाटप डॉ. तुषार ढोले यांनी केले. वीरमाता आणि वीरपत्नी यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तानाजी कोरडे, सूत्रसंचालन यशवंत गांजाळे यांनी तर रविंद्र थोरात यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)