सैनिकांप्रती सदैव कृतज्ञता व्यक्त करणे गरजेचे – खासदार संभाजीराजे छत्रपती

कोल्हापूर: देशाचे सैनिक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, सजग राहून देशाच्या सिमांचे रक्षण करीत आहेत, त्यामुळेच आपण सुरक्षित आहोत. सैनिकांप्रती सदैव कृतज्ञता व्यक्त करणे गरजेचे असून याकामे सर्वांनीच सक्रीय रहावे, असे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले.

सशस्त्र सेना ध्वजदिनाच्या निमित्ताने कोल्हापूर येथील 109 टीए मराठा लाईट इन्फ्रंटी येथे छत्रपती संभाजीराजे फाऊंडेशनच्यावतीने आयोजित कार्यक्रमावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती बोलत होते. कार्यक्रमास कर्नल दिलीपसिंह मंडलिक, ले.कर्नल मिलिंद शिंदे, संयोगिताराजे छत्रपती, परमजित कौर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांच्यासह अने कमान्यवर पदाधिकारी,लष्करी अधिकारी,जवान तसेच विविध शाळांतील विद्यार्थी उपस्थित होते.

देशाचे रक्षण करताना शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे गरजेचे असल्याचे असल्याचे सांगून खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, देशाच्या तिनही दलात कार्यरत असणाऱ्या जवानांना प्रोत्साहित करण्याबरोबर आजी -माजी सैनिक तसेच सैन्यदलाविषयी समाजात आदरभाव निर्माण होणे गरजेचे आहे. सैनिकाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)