इस्लामाबाद: पाकिस्तानचे लष्कप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी अप्रत्यक्षरित्या भारताला धमकी दिली. पाकिस्तानी सैनिकांच्या रक्ताचा हिशेब चुकता करू, असे पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी म्हटले आहे.

भारतासोबत झालेल्या १९६५ च्या युद्धदिनाला पाकिस्तान संरक्षण दिवस म्हणून साजरा करतो. या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कमर जावेद बाजवा बोलत होते. यावेळी पाकिस्तानचे अनेक आमदार, खेळाडू, कलाकार उपस्थित होते. तसेच पंतप्रधान इम्रान खान उपस्थित होते.

पाक लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद म्हणाले,आम्ही १९६५ आणि १९७१ च्या युद्धातून खूप काही शिकलो आहोत. म्हणूनच पाकने आण्विक शस्त्रांना विकसित केले आहे. पाकने दहशतवाद्यांविरोधात युद्धासाठी खूप मोठी किंमत मोजली आहे. अनेक सैनिकांचे प्राण यात गेले आहे. शिवाय आम्हांला दबाव आणण्यासाठी आमच्या शाळा आणि नेत्यांच्या घरांवर हल्ले करण्यात आले, असेही सांगितले आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या सीमेवर ज्या सैनिकांनी आपलं रक्त सांडलं आणि देशासाठी प्राण गमावले, त्यांच्या रक्ताचा हिशेब चुकता करणार असल्याचेही जावेद म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)