सैनिकांचे स्मरण प्रत्येकाने ठेवावे ः शकिल जाफरी

मंचर – सीमेवर आपल्या संरक्षणासाठी सैनिक तैनात आहेत, म्हणूनच आपण इथे निर्भय जीवन जगत आहोत. सैनिकांचे स्मरण प्रत्येकाने ठेवावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते आणि बहुभाषिक कवी मो. शकील जाफरी यांनी केले. मंचर येथील महात्मा गांधी महाविद्यालयाच्या कक्षेत कारगिल विजय दिवसानिमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात शकील जाफरी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, देशासाठी सर्वस्व समर्पित करण्याची तयारी प्रत्येक भारतीयाने ठेवावी. देशासाठी सर्वस्व अर्पित केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या जीवनावर आधारित सय्यद नसीर अहमदद्वारा लिखित पुस्तक “द इमॉर्टल्स’ यावर आधारित “नेम स्टीकर्स’ इयत्ता दहावीच्या क तुकडीतील विद्यार्थ्यांना निःशुल्क वितरीत करण्यात आले, यावेळी प्राचार्य उत्तम आवारी ही उपस्थित होते. डॉ. ज्ञानेश्वर थोरात यांनीही देशप्रेमाविषयी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी उपदेश दिले. यावेळी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)