सैदापूरचे समाजभूषण बाबुराव गोखले ग्रंथालय

प्रभात स्पेशल : ग्रंथालय चळवळ आणि वाचनसंस्कृती

कराड – एकीचे बळ हे ब्रीद वाक्‍य घेऊन अनेक तरुणांनी एकत्र येऊ डॉ. सुमन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रा. दादाराम साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली सन 1999 मध्ये समाजभूषण बाबुराव गोखले ग्रंथालयाची स्थापना केली. या ग्रंथालयात ग्रंथसंख्या 14 हजार 500, वर्तमानपत्रे 10 व मासिके 45 आहेत. सभासद संख्या 950 आहे. तसेच बालविभाग व महिला विभाग वेगवेगळे आहेत. तसेच विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेची सोय आहे. येथे स्पर्धा परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना आवश्‍यक पुस्तके, दैनिके, संदर्भ ग्रंथ ठेवण्यात आले आहेत.

विविध उपक्रमांतर्गत वर्षभर विचारवंतांची व्याख्याने आयोजित केली जातात. त्याचबरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार केला जातो. सत्कार समारंभालाही शाल, फुले, श्रीफळ यांचा वापर न करता ग्रंथ भेट देण्याचा अभिनव उपक्रम राबविला जातो. ग्रंथालयाच्या अध्यक्षा कांचन धर्मे, कार्यवाह प्रा. सूर्यमाला जाधव, विवेकानंद मुळे, ग्रंथपाल रुकसाना नदाफ या ग्रंथालयास अ वर्ग दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्व. सौ. वेणूताई चव्हाण संशोधन ग्रंथालय

पत्नी सौ. वेणूताई चव्हाण यांच्या स्मरणार्थ कराड येथे सार्वजनिक न्यास उभारुन एक वास्तू बांधण्याची स्व. यशवंतराव चव्हाण यांची इच्छा होती. या वास्तूत स्वत:च्या ग्रंथालयातील अनमोल ग्रंथ ठेवावेत. तसेच अनेक व्यक्‍ती व संस्थांनी दिलेल्या भेटीचे संरक्षण व्हावे, वस्तुसंग्रहालयाच्या रुपाने त्याचे जतन व्हावे. हे ग्रंथालय व वस्तुसंग्रहालयाच्या माध्यमातून स्व. वेणूताई यांच्या स्मृती जपल्या जाव्यात, अशी इच्छा व्यक्‍त केली होती. त्यासाठी त्यांनी देणगी म्हणून वेणूताई यांचे दागिने व उरळीकांचन येथील बागायत जमीन विकून जी रक्‍कम येईल ती न्यासास द्यावी असे 7 ऑक्‍टोबर 1983 रोजी पत्र दिले होते.

त्याप्रमाणे अस्तित्वात आलेले स्मारक म्हणजे सौ. वेणूताई चव्हाण सभागृह भवन. या ग्रंथालयात काचेच्या लाकडी कपाटात 7 हजार दुर्मिळ व मौलिक ग्रंथसंग्रह, तीनशेच्या वर जुन्या मासिकांचे बांधीव गठ्ठे, दुर्मिळ छायाचित्रांचे संग्रह, स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या 60 भाषणांचे कॅसेटस्‌, यशवंतरावांच्या चाळीस वर्षांच्या वैयक्‍तिक पत्रव्यवहाराच्या असंख्य फायली, हजारो हस्तलिखिते, कागदपत्रे, लेख, भाषणे, मुलाखती व आठवणी, गौरवांक, विशेषांक आदि साहित्य जतन करण्यात आले आहे. ग्रंथालयांचे रुपांतर संशोधन केंद्रात झाल्याने त्याचा फायदा अनेक लोक घेत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)