सेहगल यांना निमंत्रण नाकारुन आयोजकांनी अनुचित परंपरा पाडली- सुप्रिया सुळे

मुंबई: 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन करण्यासाठी आयोजकांनी ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना पाठवलेले निमंत्रण अचानक रद्द केले आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे हे निमंत्रण रद्द करण्यात आल्याचे पत्र आयोजकांनी त्यांना पाठविले आहे. यामुळे साहित्य क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, त्यांच्या भाषणाने वाद निर्माण होण्याच्या भीतीपोटी हे पाऊल संमेलन आयोजकांनी उचलल्याची चर्चा आहे.

दरम्यान, राजकीय नेत्यांनी या निर्णयाचा विरोध केला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या  प्रख्यात साहित्यिक नयनतारा सेहगल यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी दिलेलं निमंत्रण मागे घेण्यात आलं. आयोजकांनी कसल्या दडपणाखाली हा निर्णय घेतला हे स्पष्ट आहे. मराठी साहित्यसृष्टीला मोठी परंपरा आहे. साहित्यिकांनी नेहमीच समाजाला दिशा दाखविण्याचं काम केलं आहे. सेहगल यांना निमंत्रण नाकारुन संमेलनाच्या आयोजकांनी अनुचित परंपरा पाडली आहे.

नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)