‘सेस’विरुद्ध मार्केट यार्ड मंगळवारी बंद

दि पुना मर्चंट्‌स चेंबर, श्री छत्रपती शिवाजी आडते असोसिएशन, कामगार युनियनचे बंदचे आवाहन

पुणे – राज्य सरकारने अध्यादेश काढत बाजार समितीचा आवार वगळता सर्व व्यापार नियमनमुक्त केला आहे. तर बाजार समिती आवारात व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना मात्र सेस भरावा लागत आहे. हा निर्णय बाजार आवारात व्यापार करणाऱ्यांसाठी अन्यायकारक आहे. यामुळे मार्केटयार्डातील व्यापारच संपुष्टात येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मार्केट यार्डातील व्यापारही सेसमुक्त करावा. तसेच ई-नाम रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी येत्या मंगळवारी दि पुना मर्चंट्‌स चेंबरने बंद पुकारला असल्याची माहिती दि पूना मर्चटस्‌ चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

राज्य शासनाने 25 ऑक्‍टोबर रोजी अध्यादेशामुळे बाजार आवारात मिळणाऱ्या आणि बाजार आवाराबाहेर मिळणाऱ्या वस्तूंच्या किंमतीत फरक पडणार आहे. त्यामुळे ग्राहक मार्केटयार्डातून खरेदी करण्यापेक्षा बाहेरून खरेदी करतील. या प्रकारामुळे व्यावसाय घटत जाईल. व्यापाऱ्यांना दुकाने बंद करावे लागतील. अशी भितीही ओस्तवाल यांनी व्यक्त केली.
गेल्या काही वर्षांपासून भुसार बाजारात येणारा माल हा व्यापारी माल आहे. त्यावर सेस आकारणे चुकीचे आहे. तसेच ई-नाम प्रणालीमुळे गेटवरच मालाचे विभाजन, वजन, विक्री आणि शेतकऱ्यांना पैसे देणे ही बाब अशक्‍य आहे. त्यातही व्यापाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे व्यापारी चिंतेत आहेत. या अडचणींबाबत वारंवार शासन आणि प्रशासनाला पत्र व्यवहार केला आहे. मात्र शासन व्यापाऱ्यांची अडचणी जाणून घेण्यास तयार नसल्याचाच आतापर्यंत अनुभव आला असल्याचेही ओस्तवाल यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष जवाहरलाल बोथरा, सचिव अशोक लोढा, सहसचिव विजय मुथा, माजी अध्यक्ष वालचंद संचेती, प्रवीण चोरबेले आदी उपस्थित होते.

माथाडी कामगारांचाही बंद
माथाडी कामगारांचा सरकारच्या तिजोरीवर कोणत्याही प्रकारचा भार नसताना हा माथाडी कायदाच मोडीत काढायचा निर्धार या शासनाने केला आहे. या निर्णयामुळे कामगारांचे नुकसान होणार असून त्यांच्या रोजगाराचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. कामगारांशी निगडीत प्रश्‍नांवर चर्चा करण्यासाठी कामगार मंत्री वेळ देत नाहीत. एकीकडे 24 राज्यांमधे माथाडी कायदा लागू करण्याची मागणी होत असताना, राज्यातून हा कायदा मोडीत काढण्यात येत आहे. त्याविरोधात आवाज उठविण्यासाठी माथाडी कामगारांनी मंगळवारी बंद पुकारला असल्याची माहिती कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे यांनी दिली.

आडत्यांचाही बंदमध्ये सहभाग
राष्ट्रीय कृषी बाजार आणि ई-नाममध्ये ज्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे व्यापार अडचणीत येणार आहे. त्यामुळे शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी मार्केटयार्डातील फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा, केळी, पानबाजारातील आडते व्यापार बंद ठेवून मंगळवारच्या राज्यव्यापी बंद मध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे मार्केटयार्डातील सर्व विभाग बंद असणार आहेत. अशी माहिती आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)