सेव्हन स्टार मल्टीप्लेक्‍स दिवाळीत सुरु

एकूण 1000 आसनक्षमतेचे पाच स्क्रिन

सातारा,दि.7 प्रतिनिधी- साताऱ्यातील सेव्हन स्टार मल्टीप्लेक्‍सची उत्कंठा शिगेला पोहचली असून येत्या दिवाळीत पाच स्क्रिनचे पडदे उघडण्यात येणार आहेत, अशी माहिती इमारतीचे विकसक श्री.रविंद्र चव्हाण यांनी दिली.
येथील एस.टी.स्टॅड शेजारी सेव्हन स्टार नावाने भव्य मॉलची उभारणी करण्यात आली असून त्यामध्ये पुणे व मुंबई दर्जाचे मल्टीप्लेक्‍स उभारण्यात येत आहेत. मात्र, हे मल्टीप्लेक्‍स तथा चित्रपटगृह केव्हा खुले होणार याबाबतची उत्सुकता प्रत्येक सातारकराला लागलेली होती. या पार्श्‍वभूमीवर इमारतीचे विकसक श्री.रविंद्र चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मल्टीप्लेक्‍स आता अंतिम टप्प्यात असून आता लाईट फीटींगचे काम सुरू आहे. येत्या दिवाळीपुर्वी कोणत्याही परिस्थितीत खुले करण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. मल्टीप्लेक्‍समध्ये स्वतंत्र 5 स्क्रिन आहेत. त्यापैकी दोन स्क्रिनमध्ये प्रत्येकी 80 तर तीन स्क्रिनमध्ये प्रत्येक 280 आसनक्षमता असणार आहे. मल्टीप्लेक्‍स चालविण्याबाबत चित्रपटगृह व्यवसायिकांशी सध्या बोलणी सुरू असून लवकरच त्याबाबतचा निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, सातारा शहरात मागील वर्षभरात राधिका व समर्थ हे दोन्ही चित्रपटगृह बंद करण्यात आले. त्यामुळे शहरातील चित्रपट शौकीनांची भिस्त केवळ राजलक्ष्मी या चित्रपटगृहावर होती. या चित्रपटगृहात एकच स्क्रिीन असल्यामुळे शौकींनांना चित्रपट निवडण्याचा देखील एकच पर्याय राहिला होता. त्यामुळे शहरातील उच्चभ्रु नागरिक पुणे येथे खरेदीच्या निमित्ताने जात त्याच ठिकाणी चित्रपट पहाणे पसंत करित होते. मात्र, सेव्हन स्टार मल्टीप्लेक्‍सच्या निमित्ताने आता सातारा शहरात एकूण एक हजार आसनक्षमता आणि एकाच वेळी पाच स्क्रिनवर चित्रपट प्रसारित होणार असल्याने शौकीनांसाठी पर्वणीच ठरणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)