सेव्हन स्टार मल्टिप्लेक्‍सने साताऱ्याच्या वैभवात भर

सेव्हन स्टार मल्टीप्लेक्‍स उद्घाटन प्रसंगी खा.उदयनराजे, शेजारी नगराध्यक्षा माधवी कदम व इतर मान्यवर

खा. उदयनराजे:इमारतीची स्वच्छता राखण्याची सर्वांची
सातारा, दि.28 ( प्रतिनिधी) – साताऱ्यात नव्याने निर्माण करण्यात आलेले सेव्हन स्टार मल्टीप्लेक्‍सने शहराच्या वैभवात भर घातली, असे गौरवोद्‌गार खा.उदयनराजे यांनी काढले.येथील बसस्थानका शेजारी उभारण्यात आलेल्या सेव्हन स्टार मल्टीप्लेक्‍सच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. त्यावेळी नगराध्यक्षा माधवी कदम, महेंद्र चव्हाण, रविंद्र चव्हाण, सुनील काटकर, संग्राम बर्गे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खा.उदयनराजे म्हणाले, मल्टीप्लेक्‍स थिएटर पाहून खऱ्या अर्थाने डोळ्याचे पारणे फिटले. लहानपणी फाईव्ह स्टार चॉकलेट माहिती होते पण सेव्हन स्टार काय ते आज उभारण्यात आलेली इमारत पाहून कळले. खा.उदयनराजेंनी मल्टीप्लेक्‍समध्ये अभिनेत्यांच्या छायाचित्रांचे कौतुक करताना आपल्या खास शैलीत, काय बाई सांगू, कसं ग सांगू या ओळीही गुणगुणल्या. तर साताऱ्याच्या जनतेवर मनापासून प्रेम असून राजकारण वगैरे आपल्याला माहित नसल्याचे सांगितले.तसेच जनतेनेही आपल्यावर असेच प्रेम ठेवावे. तुमच्यासाठी शेवटच्या श्‍वासापर्यंत कार्यरत राहणार असल्याचे सांगितले.
तसेच या इमारतीची स्वच्छता राखण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. जो कोणी अस्वच्छता करण्याचा प्रयत्न करेल त्याची माझ्याशी गाठ असेल, असा सज्जड दम त्यांनी भरला. तर इमारतीची उभारणी करणाऱ्या चव्हाण कुटुंबियांनी कायमच आपले आदरतिथ्य केले असल्याचे सांगत आपण त्यांचा ऋणी असल्याचे आवर्जुन सांगितले.
सेव्हन स्टारमुळे आता सातारकरांनी पुण्याला जावे लागणार नाही. विशेषत: महिला वर्गांना या ठिकाणी दर्जेदार चित्रपट पाहण्याची संधी मिळणार असून त्यामुळे महिलांमध्ये निश्‍चितपणे आनंदाचे वातावरण असल्याचे नगराध्यक्षा माधवी कदम यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक महेंद्र चव्हाण यांनी तर सुत्रसंचालन तुषार भद्रे यांनी केले.

 


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)