सेव्हन लव्हज चौकातील उड्डाणपुलाचे भूमिपूजन

मार्केट यार्ड- सर्वसामन्यांना केंद्रस्थानी ठेवून विकासाची दिशा आखणे ही भाजपची मुख्य भूमिका आहे. याच निकषावर या उड्डाणपुलाचे काम करण्यात येत आहे. वाहनांची संख्या वाढल्याने रस्त्यावरून चालताना असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी असलेल्या ठिकाणी विकासाची कामे करण्याची भूमिका आम्ही घेतली आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. सेव्हन लव्हज ते वखार महामंडळ या महत्त्वाकांक्षी उड्डाणपुलाचे भूमिपूजन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी राज्यमंत्री दिलीप कांबळे, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, आमदार माधुरी मिसाळ, महापौर मुक्‍ता टिळक, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, नगरसेवक गोपाल चिंतन, कविता वैरागे, प्रवीण चोरबेले, राजश्री शिळीमकर, रुपाली धाडवे, साईदिशा माने, मानसी देशपांडे, राणी भोसले, दिनेश धाडवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दिलीप कांबळे म्हणाले की, झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांना एक उत्तम असे घर मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे. पालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भीमाले म्हणाले की, उड्डाणपूल तयार होताना या भागातील कोणत्याही नागरिकांचे घर बाधित होणार नाही. उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून तो नागरिकांना वाहतुकीस सुरू करणार आहोत, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. माजी नगरसेवक भरत वैरागे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)