मुंबई: चालू आर्थिक वर्ष खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी समाधानकारक असेल. कर्मचाऱ्यांना सरासरी 10 टक्के पगारवाढ मिळण्याची शक्‍यता आहे. सेवा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी ही पगारवाढ 15 टक्‍क्‍यांपर्यंत असेल, तर औद्योगिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मात्र कमी पगारवाढीचे संकेत आहेत.
रोजगार क्षेत्रासंदर्भात सर्वेक्षण करणाऱ्या टीमलीझ सर्व्हिसेसने 2017-18 या आर्थिक वर्षातील पगारवाढीचा अभ्यास केला. त्याआधारे त्यांनी 2018-19 आर्थिक वर्ष कर्मचाऱ्यांसाठी कसे असेल, याचा अंदाज बांधला आहे. या अभ्यासानुसार, डिजिटायझेशनमुळे सध्या वित्त तंत्रज्ञान व ई-कॉमर्स क्षेत्राला सुगीचे दिवस आले आहेत. एकूण 17 क्षेत्रापैकी 9 क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांना दमदार पगारवाढीची शक्‍यता आहे. त्यात स्टार्ट अप्स, इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणे तयार करणाऱ्या व तयार खाद्यपदार्थांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या, फार्मा, आयटी, मीडिया व मनोरंजन, किरकोळ तसेच टेलिकम्युनिकेशन्स या क्षेत्रांचा समावेश आहे. या सर्व क्षेत्रांमधील कर्मचाऱ्यांना 12 ते 15.37 टक्‍केपगारवाढ मिळण्याचे संकेत आहेत.
सर्वाधिक 15.37 टक्‍के पगारवाढीमध्ये आयटी राजधानी म्हणून ओळख असलेल्या बंगळुरूतील ई-कॉमर्स कंपन्यांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ मुंबईतील शैक्षणिक संस्थांमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना 14.55 टक्के पगारवाढीचा अंदाज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)