सेवा क्षेत्रात समभागांमध्ये “एफडीआय’ची 15 टक्‍क्‍यांनी वाढ

नवी दिल्ली – 2017-18 मध्ये (एप्रिल-ऑक्‍टोबर) सेवा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक समभागाचा ओघ 15 टक्के वाढल्याचे आर्थिक सर्वेक्षणात म्हटले आहे. व्यापार करण्यासाठी अनुकूल वातावरण, वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी, राष्ट्रीय बौध्दिक संपदा हक्क धोरणाची घोषणांसारख्या अनेक सुधारणा हाती घेऊन सरकारने गुंतवणूकीसाठी भारताचे आकर्षण राहील यावर कटाक्ष ठेवल्यामुळे ही वाढ झाली आहे.

सर्वेक्षणात एप्रिल ते ऑक्‍टोबर दरम्यानच्या कालावधीत सेवा क्षेत्राचा अंतर्भाव असलेल्या 25 क्षेत्रांद्वारे प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूकीसाठी 100 क्षेत्र विकासांतर्गंत घेण्यात आली आहे. बांधकाम विकास, प्रसारण, किरकोळ व्यापार, हवाई वाहतूक, विमा आणि निवृत्ती वेतन यासारख्या क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक धोरण तरतुदींचा आढावा घेण्यात आला . वित्त आणि गैरवित्त सेवा अशा 10 आणि अति महत्वाच्या क्षेत्रातल्या माहिती प्रसारण, सागरी वाहतूक, हॉटेल आणि पर्यावरण, सल्ला सेवा अशा उत्कृष्ट सेवा क्षेत्रांना एफडीआय अंतर्गत घेण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)