सेवा केंद्र चालकांकडून ऑनलाइन सातबाराचा गैरवापर

  • महाभूलेखवरील सातबारा प्रिंटआऊट कायदेशीर कामासाठी अवैध

थेऊर -महाभूलेख या संकेतस्थळावरून गावनमुना सातबारा व 8 अ ऊतारा हा फक्त माहितीसाठी असून त्याच्या प्रिंटआऊटचा कुठेही कायदेशीर कामासाठी वापर करता येणार नाही. काही सेतू चालक, महा ई सेवा केंद्र व संग्राम चालक महाभूलेख संकेतस्थळावरून सातबारा व 8 अ वर आपला सही, शिक्का उमटवून ते नागरिकांना वितरित करतात. अशा सेवा केंद्र चालकांवर कारवाई करण्याचा इशारा ई फेरफार आज्ञावलीचे राज्य समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिला आहे. त्याबाबतचे परिपत्रक जमाबंदी आयुक्त भूमी अभिलेख संलग्न उपसंचालक कार्यालयातून जारी करण्यात आले आहे.
महाभूलेख संकेतस्थळावरून काढलेल्या सातबारा व आठ अ वर आपला सही शिक्का उमटवू नये अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कडक कारवाई करण्याचे सूतोवाच दिलेले आहेत. ई फेरफार प्रकल्पाअंतर्गत राज्यातील सर्व अधिकार अभिलेखांचे संगणकीकरण करण्यात आले असून हे अभिलेख जनतेला माहितीसाठी महाभूलेख संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. सध्या या प्रकल्पाचे क्‍लाऊडवर स्थलांतर करण्यात आले आहे. कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर कामासाठी उपयोगात येणाऱ्या डिजीटल स्वाक्षरीत 7/12 ची पडताळणी संकेतस्थळावरून सातबारावर छापलेल्या सांकेतिक क्रमांकावरून करण्यात येईल राज्यातील सर्व जिल्ह्यांत परिपत्रकाची अंमलबजावणी करणेविषयी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)