सेवानिवृत्त शिक्षिकेला 27 हजाराला गंडा

वाई, दि. 21(प्रतिनिधी)- धर्मपुरी, वाई येथील सेवानिवृत्त शिक्षिका सीताबाई बाळू जमदाडे (वय 64) यांची दोन युवकांनी फसवणूक केल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
अधिक माहिती अशी, मंगळवार, 20 रोजी सकाळी 11.30 च्या सुमारास सीताबाई जमदाडे या भाच्याची औषधे बदलण्यासाठी पोस्ट ऑफिस परिसरातील मेडिकलमध्ये आल्या होत्या. यावेळी अंदाजे 22 ते 25 वयाच्या दोन युवकांनी त्यांना सोलापूरला जायचं असून वाटखर्चीला पैसे नाहीत असे म्हणत पैशाची मागणी केली. जमदाडे यांनी पर्समधील पंचवीसशे रूपये त्यांना काढून दिले. त्यानंतर त्या युवकांनी तुमचा भाचा दवाखान्यात आहे. त्याला उपचारासाठी पैशाची गरज म्हणून दागिन्यांची मागणी केली. जमदाडे यांनी स्वतः च्या अंगावरील 25 हजाराचे दागिने यामध्ये सोन्याची साखळी, बांगड्या, अंगटी इत्यादी ऐवज युवकांना दिला. त्यानंतर त्या युवकांनी जमदाडे यांना घरी जाण्यासाठी रिक्षा मध्ये बसवून दिले व पोबारा केला. घराजवळ गेल्यावर जमदाडे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी त्वरित भाऊ व बहिणीला याबाबतची कल्पना दिली व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अधिक तपास वाई पोलीस करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)