सेवानिवृत्त शिक्षकाची 14 लाखाची फसवणूक

सात जणांवर गुन्हा दाखल

कराड, दि. 11 (प्रतिनिधी)- बोगस पॉलिसींद्वारे सेवानिवृत्त शिक्षकाची 14 लाख 24 हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी 7 जणांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी संभाजी ज्ञानदेव दाभोळे (वय 62, रा. बालाजी कॉलनी, आगाशिवनगर, मूळ रा. साळशिरंबे, ता. कराड) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संभाजी दाभोळे यांना जानेवारी 2016 पासून वारंवार फोन येत होते. सोनिया शर्मा ही महिला फोन करून टाटा लाईफ इन्शुरन्स ग्रेटर नोएडा या कंपनीत तुमचे 2 लाख रूपये आहेत, असे सांगत होती. वारंवार फोन आल्याने दाभोळे यांचा त्यावर विश्‍वास बसला. सोनियाने तिचे वरिष्ठ जगमोहन सक्‍सेना यांच्याशी त्यांचा संपर्क करून दिला. 2 लाख रूपये मिळण्यासाठी 30 हजाराची पॉलिसी काढण्यास सांगितले. त्यानुसार पॉलिसी काढून तिचे सर्टीफिकेट मिळाले की लगेच दुसरी पॉलिसी काढायला सांगितली. असे करत-करत दाभोळे यांनी स्वत:च्या नावे 8, पत्नीच्या नावावर 2, मुलीच्या नावावर 2 आणि जावयाच्या नावावर 5 पॉलिसी केल्या. प्रत्येक पॉलिसीची रक्‍कम मूळ रकमेत मिळविल्याचे संबंधितांनी सांगितले. त्यानंतर तुमचा पैसा काळे धन म्हणून जाहीर न होण्यासाठी, आयकर विभाग, सीबीआयकडून चौकशी न होता रक्‍कम परत मिळावी, यासाठी विविध कारणे पुढे करून दाभोळे यांच्याकडून सुमारे 14 लाख 24 हजार रूपये उकळून त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी दाभोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जगमोहन सक्‍सेना, अमन मल्होत्रा, अनुराग बासू, सत्यजित पाठक, राजसिंग मल्होत्रा, रामकुमार यादव, दिनदयाळ रेड्डी यांच्याविरूध्द तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)