सेवानिवृत्त ग्रामसेवकाचा मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू

कोल्हापूर – शेतात भातराखण करण्यास गेल्यानंतर रविवारी दुपारी मधमाशांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले तारळे खुर्द ता. राधानगरी येथील सेवानिवृत्त ग्रामसेवक ज्ञानदेव महादेव पाटील (वय 72) यांचा आज अखेर मृत्यू झाला.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी, तारळे खुर्द येथील कुदळ ओपा नावाने ओळखल्या जाणाऱ्या शेतात वानरे भात पिकाचे नुकसान करतात म्हणून ज्ञानदेव पाटील हे दुपारी तीनच्या सुमारास राखणीसाठी गेले होते. मात्र, संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यत ते परत न आल्यामुळे घरातींल लोकांनी शेताकडे धाव घेतली. शेतात मुख्य रस्त्याशेजारीच पाटील हे मधमाशाच्या हल्यामुळे जखमी होऊन पडल्याचे निदर्शनास आले. पाटील यांच्या तोंडासह सर्व अंगावर मधमाशा डसल्याचे दिसून आले मधमाशांच्या हल्ल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते. जरवमी अवस्थेत त्यांना रात्री कोल्हापूरातील खाजगी रुग्णालयात हलवले मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. सीपीआर रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)