सेवानिवृत्तीनिमित्त तात्यासाहेब धांडे यांचा गौरव समारंभ

कामशेत : येथील शिक्षक तात्यासाहेब धांडे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सभापती गुलाब म्हाळसकर व माजी आमदार दिगंबर भेगडे यांच्या हस्ते मानपत्र व सन्मानचिन्ह देवून सपत्निक गौरव करण्यात आला.

कामशेत (वार्ताहर) – संस्कारक्षम नागरीक घडविण्याचे कार्य शिक्षक करतात म्हणून त्यांना समाजात मानाचे स्थान आहे, असे प्रतिपादन माजी आमदार दिगंबर भेगडे यांनी कामशेत येथे केले. ज्येष्ठ अध्यापक तात्यासाहेब धांडे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्ताने आयोजित गौरव समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गायक सुरेश साखवळकर हे होते.

या वेळी मावळचे सभापती गुलाब म्हाळसकर, विद्यालयाचे प्राचार्य नागेश माहुल्‌े, माजी प्राचार्य सुरेश घुले, सुरेश बोरकर, नाथा मानकर, बाळासाहेब कडाळे, बबन भसे, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष राजेश गायकवाड, रामराव जगदाळे, सुनील वाळुंज आदी उपस्थित होते.

विद्यालयाच्या वतीने मानपत्र, विठ्ठलाची मूर्ती, शाल-श्रीफळ देवून गौरव करण्यात आला. म्हाळसकर, धोंडीबा कुंभार, रामदास वाडेकर, संजय वाघ, शिवराम सुपे, अनुराधा वाघ, नारायण ठाकर, सुखदेव ठाकर यांची या वेळी भाषणे झाली. धांडे यांनी सत्काराला उत्तर देताना देताना पुणे जिल्हा शिक्षण मंडळामुळे जीवनात विद्यार्थी ज्ञानदानाचे काम कता आले.
उमेश सोनवणे यांनी मानपत्राचे वाचन केले. धांडे यांनी संस्थेच्या कोळवण, शिवणे, चऱ्होली व कामशेत या शाखांमधून 37 वर्षे सेवा केली आहे. कार्यक्रमाचे प्रास्तविक पर्यवेक्षक बाळासाहेब शेंडे यांनी केले. सूत्रसंचालन शरद वाजे, आरती बोत्रे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन दत्तात्रय गायकवाड, मुकुंद ढोरे, मनिषा सुपेकर, शिक्षकेत्तर कर्मचारी दशरथ जाधव, सिद्धार्थ गायकवाड, शंकर वैरागर, बाळासाहेब करवंदे यांनी केले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)