सेवाधाममध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

केंदूर -पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील सेवाधाम विशेष मुलांच्या शाळेमध्ये पर्यावरणपूरक गणपतीची स्थापना करण्यात आल्याचे मुख्याध्यापक पवन कट्यारमल यांनी सांगितले. विद्यालयात यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव या संकल्पनेतून संपूर्ण सजावट करून कागदी फुलांचा वापर केला आहे. तसेच गणेशमूर्ती ही कागदापासून तयार केलेली आहे. तसेच डिजेचा वापर न कता ध्वनी प्रदूषण टाळण्याचा संदेशही विशेष मुलांनी दिलेला आहे. सजावटीतून जलप्रदूषण टाळण्याचा संदेश देऊन पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जात आहे. गणेशोत्सवातया शाळेतील विशेष मुलांमध्ये वेगळेच चैतन्य निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)