सेवाग्राम विकासासाठी 18 कोटी रुपयांचा निधी – सुधीर मुनगंटीवार

मुंबई: वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम परिसरात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 162.51 कोटी रुपयांचा सेवाग्राम विकास आराखडा राबविला जात आहे. या आराखड्याअंतर्गत विविध विकास कामे करण्यासाठी 2018-19 या वित्तीय वर्षात 26 कोटी 8 लाख रुपयांचा निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. त्यापैकी 18 कोटी 25 लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकारी वर्धा यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. या संबंधीचा शासन निर्णय नियोजन विभागाने 4 जानेवारी 2019 रोजी निर्गमित केला आहे.

मुनगंटीवार म्हणाले, औरंगाबाद येथील श्रीक्षेत्र घृष्णेश्वर विकास आराखड्यासही शासनाने मान्यता दिली आहे. हा आराखडा 112.41 कोटी रुपयांचा आहे. या आराखड्यातील सन 2018-19 या अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या 13 कोटी 71 लाख रुपयांच्या निधीपैकी 9 कोटी 58 लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकारी, औरंगाबाद यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)