सेवागिरी रथावर 56 लाख 13 हजार रुपये अर्पण

पुसेगाव – श्रीसेवागिरी महाराजांच्या रथोत्सवासाठी विविध भागातून आलेल्या भाविकांनी मोठ्या भक्तीभावाने यावेळी रथावर 56 लाख 13 हजार 64 रुपयांच्या नोटा अर्पण केल्या. गेल्या वर्षीप्रमाणे यावेळीही काही भाविकांनी रथावर परदेशी चलन अर्पण केले आहेत.

शुक्रवारी सकाळी दहा वाजता राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या हस्ते रथपूजन झाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रथपूजन सोहळ्यास कृष्णा खोऱे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे-पाटील, कृषी राज्यमंत्री सदाशिव खोत, खासदार उदयनराजे भोसले, मठाधिपती सुंदरगिरी महाराज, आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयकुमार गोरे,सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, अतिरीक्त पोलिस अधिक्षक धीरज पाटील, विश्‍वस्त मोहनराव जाधव, योगेश देशमुख, प्रताप जाधव,रणधीर जाधव, सुरेशशेठ जाधव आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रथ पूजन झाल्यानंतर महाराजांच्या रथाने पुसेगाव प्रदक्षिणेला प्रारंभ केला. श्रीसेवागिरी मंदिरातील समाधीपूजनानंतर झाल्यावर अकरा वाजता रथ मिरवणूकीसाठी हलविण्यात आला. राज्याच्या विविध भाविकांनी रथावर 56 लाख 13 हजार 64 रुपये अर्पण केले. श्री सेवागिरी महाराजांवरील अपार श्रध्देमुळे गोरगरीब लोकही ऐपतीप्रमाणे पैसे रथावर अर्पण करुन नतमस्तक होतात.

काही कारणास्तव रथोत्सवास येऊ न शकणारे भाविक यात्राकाळात समाधी व रथदर्शनासाठी येऊन रथावर रक्कम अर्पण करतात. त्यामुळे रथावरील रकमेत आणखी वाढ होईल असे सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या विश्‍वस्तांनी सांगितले. रथावरील जमा झालेली रक्कम ही सेवागिरी देवस्थान ट्रस्टतर्फे गोरगरीब व्यक्तींसाठी तसेच समाजोपयोगी कार्यासाठी उपयोगात आणली जाते. पोलिस विभागाने सुरक्षिततेसाठी योग्य नियोजन केल्यामुळे अनुचित प्रकार घडला नसल्याचे सहायक पोलिस निरीक्षक विश्‍वजीत घोडके यांनी सांगितले.

नोटांची जुळणी केल्यानंतर रात्री अकरा वाजता नोटा मोजण्यास सुरुवात झाली. पहाटे चार वाजेपर्यंत नोटा मोजण्याचे काम पूर्ण झाले. मठाधिपती सुंदरगिरी महाराज, डॉ. सुरेश जाधव, विश्‍वस्त मोहनराव जाधव, रणधीर जाधव, योगेश देशमुख, प्रताप जाधव, सुरेशशेठ जाधव, सचिव अविनाश देशमुख, व्यवस्थापक विशाल माने तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)