सेवागिरी यात्रेवर सीसीटीव्हीचा वॉच

यात्रा कालावधीत कायदा-सुव्यवस्थेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज

पुसेगाव, दि. 27 (वार्ताहर) – पुसेगाव यात्रानिमित्त रविवारी दि. 30 ते 9 जानेवारी दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस फौज पुसेगावात दाखल झाली आहे. तसेच सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या सहकार्याने मुख्य रस्ता तसेच यात्रा स्थळावर ठिकठिकाणी 20 सी. सी. टी. व्ही.ची व्यवस्था करण्यात आली आहे. झेंडा मिरवणूक काळात दि. 30 रोजी व दि. 3 च्या मध्यरात्रीपासून व यात्रेचा मुख्य दिवस दि. 4 जानेवारी रोजी मध्यरात्री 12 या कालावधीत वाहन पार्किंग व वाहतुक व्यवस्थतेत तात्पुरता बदल करण्यात आला असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक धीरज पाटील व पुसेगावचे सहायक पोलीस निरीक्षक विश्‍वजित घोडके यांनी दिली.
यात्रा कालावधीत जिल्हा पोलीसप्रमुख पंकज देशमुख, अतिरिक्त पोलीस अधिक्षक धीरज पाटील, कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पुसेगाव पोलीस ठाण्याचे सपोनि विश्‍वजित घोडके बंदोबस्ताचे काम पाहणार आहेत. 1 डी.वाय.एस.पी., सपोनि व पोलीस उपनिरीक्षक मिळून 15 अधिकारी, 177 पोलिस कर्मचारी, 300 होमगार्ड बंदोबस्तासाठी आहेत. तसेच रथाच्या मुख्यदिवशी अतिरिक्त 7 अधिकारी व 135 पोलीस कर्मचाऱ्यांची कुमक पाठवण्यात येणार आहे.
यात्रा काळातील अकरा दिवसांत जड वाहनांना पुसेगावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. सातारा बाजूकडून दहिवडीकडे जाणारी वाहने नेर, राजापूर कुळकजाई मार्गे तर दहिवडीकडून येणारी वाहने पिंगळी फाट्यावरून वडूज, चौकीचा आंबा मार्गे व दुचाकी वाहने कटगुण, खटाव, खातगूण जाखणगाव मार्गे विसापूर फाट्यामार्गे साताराकडे वळवण्यात आली आहेत. वडूज बाजूकडून फलटणला जाणारी व येणारी वाहने खटाव, जाखणगाव, विसापूर फाटा ते नेर मार्गे वळवण्यात येणार आहेत. तर दहिवडी ते डिस्कळ जाणारी वाहतुक निढळ,मलवडी राजापूर मार्गे जातील.
ऊस वाहतुक करणारी वाहने पुसेगावात न येता विसापूर फाटा चौकीचा आंबा मार्जे पळशी कडे वळवण्यात येणार आहेत.
वडूज रोड वरील गॅस एजन्सी कडून येथील छ.शिवाजी चौकाकडे जाण्याकरीता एस.टी बसेस वगळून सर्व वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. चारही रस्त्याच्या दुतर्फा नो पार्कींग झोन केले आहेत. विसापूर फाट्याकडून शिवाजी चौकाकडे जाण्याकरीता सर्व वाहनानां बंदी घालण्यात आली आहे. निढळ रस्त्यावरील शिवराज मंगल कार्यालयाकडून शिवाजी चौकाकडे जाण्याऱ्या वाहनांना व फलटण दिशेकडून शिवाजी चौकाकडे जाण्याऱ्या वाहनांना बंदी करण्यात आली आहे. सेवागिरी मंदिर परिसरासह छ. शिवाजी चौक, करमणूकीची साधने, बैलबाजार आणि यात्रा स्थळावरील बसस्थानके याठिकाणी पोलीस चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बॉंब शोधक पथकाचह नेमणूक
यात्रेत घातपात होवू नये याकरता बॉम्ब शोध व नाशक पथक, घातपात विरोधी तपासणी पथक नेमण्यात आले असून गर्दीच्या ठिकाणी अत्याधुनिक सी.सी.टी व्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. परजिल्ह्यातील गुन्हेगारांबाबत माहिती असणारे गुन्हे अन्वेषण कर्मचारी येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)