सेल्फी घेण्यास सारा अली खानचा विरोध

सैफ अली खानची मुलगी सारा अली खानचा पदार्पणाचा सिनेमा “केदारनाथ’ येण्यापूर्वीपासूनच सारा खूप चर्चेमध्ये आहे. मात्र यावेळी चर्चेत राहण्याचे कारण वेगळेच आहे. तिने तिच्या एका फॅनला सेल्फी घेण्यास विरोध केला आहे. या फॅनने ट्विटरवर केलेल्या एका पोस्टमध्ये याबाबत सारावरचा आपला सगळा राग व्यक्‍त केला आहे. “रुबी जैन’ नावाच्या अकाउंट होल्डरने याबाबतची हकिगत लिहीताना म्हटले आहे, की साराची मार्केटमध्ये भेट झाल्यावर सेल्फी घेण्यास साराला सुचवले होते.

मात्र साराने त्यास साफ नकार दिला. हा विषय तिथेच संपला असता. मात्र या ट्विटला अनेकांनी रिट्विट करायला सुरूवात केली. साराने यापूर्वीही अनेकांना सेल्फी घेण्यास नकार दिला होता. त्याबाबतचे अनुभव अनेकजण ट्विटरवर पोस्ट करायला लागले. “केदारनाथ’ अजून रिलीजपण झालेला नाही, तर सारा एवढा माज करते आहे, असे एकाने कॉमेंटही केले आहे. सारा सध्या “केदारनाथ’च्या अर्धवट राहिलेल्या शुटिंगच्या बरोबर “सिंबा’मध्येही काम करते आहे. “केदारनाथ’मध्ये तिच्या बरोबर सुशांत सिंह राजपूतही असणार आहे. साराचे हे नखरे असेच सुरू राहिले, तर तिचे पहिले सिनेमे रिलीज होण्यापूर्वीच तिला ट्रोल करायला सुरूवात होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)