सेलिब्रेटी नव्हे तर चांगले अभिनेते बनण्याचा प्रयत्न करा

अभिनेते अभिजित खांडकेकर ः पुरुषोत्तम करंडक जिंकलेल्या कलाकारांचा विशेष गौरव सोहळा
नगर  – सारडा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पुरुषोत्तमसारखा मानाचा करंडक पटकवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पी.सी.ओ. एकांकिकेत जुना काळ उभा करुन चांगले सादरीकरण केले आहे. त्यामुळे या कलाकार विद्यार्थ्यांचे करावे कौतुक तेवढे कमी आहे. यशस्वी विद्यार्थ्यांनी या यशामुळे मिळालेल्या प्रसिद्धीचा आनंद नक्कीच साजरा करा. मात्र यश व प्रसिद्धी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, यात गल्लत करु नका. अजून खुप पुढे जात मोठे यश संपादन करायचे आहे, म्हणून जीवनात सेलिब्रेटी बनण्याचा प्रयत्न करु नका तर चांगले अभिनेते बना. सारडा महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना भरपुर प्रोत्साहन व पाठबळ दिले आहे. असे चांगले कॉलेज प्रत्येकाला लाभले तर विद्यार्थी कलाकार पुरुषोत्तम पर्यंतच काय ऑस्कर ऍवॉर्डपर्यंतही जातील, असे प्रतिपादन माझ्या नवऱ्याची बायको या सिरिअल फेम अभिजित खांडकेकर यांनी केले.
पेमराज सारडा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत सादर केलेल्या पी.सी.ओ. एकांकिकेस पुरुषोत्तम करंडक मिळाल्याबद्दल मंडळाचे सचिव सुनिल रामदासी यांच्या पुढाकारातून एकांकिकेमधील सर्व कलाकारांचे कौतुक करण्यासाठी विशेष गौरव सोहळ्याचे आयोजन सहकार सभागृह येथे करण्यात आले होते. माझ्या नवर्याची बायको सिरिअल मधील गुरुची भुमिका करणारे अभिजित खांडकेकर यांच्या हस्ते एकांकिकेमधील सर्व कलाकारांना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. एकांकीका सादर करणारे कलाकार दिग्दर्शक विनोद गरुड, मोनिका बनकर, अविष्कार ठाकूर, रेवती शिंदे, आश्‍लेषा कुलकर्णी, सोहम दयामा, गौरी डांगे, निरंजन केसकर, विशाल साठे, लेखक अमोल साळवे, संगीत योजना श्रुती भाटे, प्रकाश योजना अमोल साळवे, स्वराज अपूर्व, अनिल क्षिरसागर, वैष्णवी लव्हाळे आदींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक, कार्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा, सचिव सुनिल रामदासी, महाविद्यालयाचे चेअरमन ऍड.अनंत फडणीस, प्राचार्या डॉ.अमरजा रेखी, जिल्हा बॅंकेचे मुख्य कार्य.अधिकारी रावसाहेब वर्पे आदिंसह हिंद सेवा मंडळाचे सर्व संचालक महाविद्यालयातील प्राध्यापक व विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अभिजित खांडकेकर यांनी विद्यार्थी कलाकारांना अभिनय क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स दिल्या. ते म्हणाले, भरपूर मेहनत घेऊन चौफेर दृष्टीकोन ठेवून अभिनय करा. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. यशस्वी झाल्यावर जर डोक्‍यात हवा गेली तर तुम्हाला मिळालेल्या मखमली खुर्चीचा काटेरी मुकूट होईल. म्हणून जमिनीवर पाय ठेवून काम करा.
प्रारंभी गणेश वंदनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. प्राचार्या डॉ.अमरजा रेखी यांनी स्वागत केले. उपप्राचार्य डॉ.राजेंद्र शिंदे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले हिंद सेवा मंडळाचे संचालक अजित बोरा, सुजित बेडेकर, डॉ.पारस कोठारी, मधुसूदन सारडा, संजय जोशी, अनिल देशपांडे, अशोक उपाध्ये, प्रा.मकरंद खेर, अनंत पाठक, ऍड.रमेश झरकर, प्रबंधक अशोक असेरी, ज्योती कुलकर्णी, बी.यु.कुलकर्णी, नवनाथ जंगले, सचिन मुळे, कल्याण लकडे, पी.डी.कुलकर्णी आदिंसह मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.

गळाभेट घेऊन केले अभिनंदन
गौरव सोहळ्यानंतर पीसीओ एकांकिकेचे सादरीकरण झाले. या सादरीकरणासही सभागृहातील रसिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. एकांकिका संपल्यावर सर्वांनी उभे राहुन टाळ्या वाजून कलाकारांच्या सादरीकरणाचे कौतुक केले. अभिनेते अभिजित खांडकेकर यांनीही या एकांकिकेचा आस्वाद घेतला. एकांकिका संपताच स्टेजचा पडदा बाजूला करुन त्यांनी थेट स्टेजवर जाऊन सर्व कलाकारांचे गळाभेट घेऊन अभिनंदन केले. सर्वांबरोबर सेल्फीही घेतली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)