सेलिब्रिटींची घरे सजवताना….

घराची अंतर्गत सजावट ही घर खरेदीप्रमाणेच तितकीच महत्त्वाची आहे. घरी आल्यावर प्रसन्न वाटावे, वातावरणात उत्साह राहावा यासाठी घरातील अंतर्गत सजावट आणि रचनेला अत्यंत महत्त्व आहे. सामान्य व्यक्तीपासून ते सेलिब्रेटीपर्यंतची मंडळी सजावटीला प्राधान्य देत असल्याचे दिसून आले आहे. विशेषत: वास्तुशास्त्राप्रमाणे घराची सजावट करण्याबाबत अनेक मंडळी आग्रही असतात. आजकाल सामान्य मंडळीदेखील सजावटीबाबत दक्ष असतात. अशा स्थितीत सेलिब्रेटींच्या घराबाबत विचारच करायला नको.

आलिशान वाटणारी ही घरे ही इंटेरियर डिझायनरच्या आविष्काराचा उकृष्ट नमुना असतो. नामांकित व्यक्तींच्या घराची सजावट करताना डिझायनरला सेलिब्रेटीची सुरक्षा, कर्मचारी वर्ग याचा खास विचार करावा लागतो. गजबजलेल्या ठिकाणी जर घर असेल तर अशा ठिकाणी डिझायनरचे कसब पणाला लागते. सेलिब्रिटीचे घर सजवणे ही सोपी बाब नाही.

-Ads-

आशिष शहा हे इंटेरियर डिझायनर असून ते अनेक वर्षांपासून नामांकित व्यक्तींच्या घरांची सजावट आणि आखणी यशस्वीपणे करत आहेत. सेलिब्रेटींचे घर सजवताना कोणकोणता विचार केला जातो, याबाबत त्यांनी काही बाबी शेअर केल्या आहेत.

शहा यांनी अनेक नामांकित सेलिब्रेटींच्या घरांची सजावट केली आहे. यात ऋतिक रोशन, रणबीर कपूर, जॅकलिन फर्नांडिस, कतरिना कैफ, अभिषेक कपूरपासून ते अर्जुन रामपाल यासारख्या बॉलिवूड ताऱ्यांचा समावेश आहे. इंटिरिअर डिझायनिंगच्या आपल्या शैलींबाबत आशिष यांनी अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. ते म्हणतात, माझ्या व्यवसायात काळानुरूप बदल झाला आहे आणि त्याचबरोबर कलात्मकता आणि सौंदर्यास अनुसरून काही तत्त्वांतही बदल झाले आहेत. इंटेरियर व्यवसायात असामनता तसेच कठोरता याची महत्त्वाची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. मला नैसर्गिक ठिकाणांची अधिक आवड आहे. निसर्गाची जपवणूक करणाऱ्या गोष्टींची मला आवडतात. अर्थात व्यवसाय करताना व्यवसाय करताना या गोष्टींची मी खबरदारी घेतो. कोणतीच गोष्ट कायम नाही, कोणतीच गोष्ट परिपूर्ण नाही किंवा सर्वश्रेष्ठ नाही. कला देखील कालानुरुप बदलत जाते, मात्र त्याचे सौंदर्य कमी होणार नाही, याची दक्षता मी घेतली आहे.

माझ्या रचनात्मक व्यवसायात संतुलनाचा विचार देखील महत्त्वाचा भाग आहे. कलात्मकतेने साकारलेल्या रचनेत साहित्य, रंगांचा अनोखा ताळमेळ साधण्याचा प्रयत्न केला जातो. आजकालच्या सेलिब्रेटींना खासगी आयुष्य सहजपणे व्यतित करता येईल, असे ठिकाण हवे असते. त्याठिकाणचे वातावरण पर्यावरणपूरक असण्याबरोबरच संचार स्वातंत्र्यही हवे असते. अशाच प्रकारच्या ठिकाणांना ते प्राधान्य देतात. तरुण सेलिब्रेटींसाठी घरांची अंतर्गत रचना करताना आम्ही काही गोष्टींची खबरदारी घेतो. विशेषत: ज्यांचे घर गजबजलेल्या शहरात आहे, अशा ठिकाणी सेलिब्रेटीना वावर करताना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. अपार्टमेंटमध्ये सेलिब्रेटींचा साधारणपणे प्रवेश आणि स्वयंपाकघराची रचना करणे अवघड बाब असते. अशा ठिकाणी कर्मचाऱ्यांसाठी वेगळा रस्ता काढणे गरजेचे असते. म्हणून आर्किटेक्‍चरल प्लॅनिंगचा प्रयोग गार्डन, बाल्कनी तसेच छताबाहेरील भागावर करावा लागतो. बहुतांश सेलिब्रिटींच्या घराबाहेर मोकळी जागा असते आणि तेथून निसर्गसौंदर्य न्याहळता येते. शहरात अशा प्रकारचे घर असणे हे एखाद्या आलिशान घरापेक्षा कमी नाही. परंतु त्याबरोबर सुरक्षा आणि खासगीपणा राखणेदेखील तितकेच अवघड असते.

लॅंडस्केपिंगच्या मदतीने भिंतीशिवाय मोकळ्या जागेला आच्छादित केले जाते. तसेच नैसर्गिक वातावरण राखण्यातही मदत मिळू शकते. ऋतिक रोशन हा एक परफेक्‍शनिस्ट कलाकार आहे. तो प्रत्येक गोष्टींकडे बारकाईने पाहतो. त्याला जे हवे तेच तो करून घेतो आणि ते काम सर्वोत्तम कसे होईल, याचाच प्रयत्न करतो. त्याच्या घराच्या लिव्हिंग रूममध्ये निळा रंग वापरण्याचा निर्णय घेतला होता. ऋतिकचे घर समुद्रकिनाऱ्याजवळ असल्याने हा रंग त्याच्या अपार्टमेंटच्या पांढऱ्या भिंतीला अगदी अचूक राहिला. याशिवाय सॅटोरिनी ब्लू रंग वापरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तो रंग शोधणे आमच्यासाठी कठीण बाब होती. या रंगांचा अनेक ठिकाणी पाठपुरावा केला. मिलानपासून ते पॅरिसपर्यंत या रंगाचा शोध घेतला. शेवटी आम्हाला तो रंग गवसला आणि ऋतिकच्या मनातील घर साकार करणे शक्‍य झाले.

– विनिता शाह

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)